
पुण्यातील पावसामुळे भाटघर धरण ९२ टक्के भरलं.
धरण ब्रिटीशकालीन आहे.
पुढील चार ते पाच दिवसांत भाटघर धरण १००% भरू शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सागर आव्हाड, साम टीव्ही
पुणे : मागील दोन दिवसांपासून तालुक्यात सुरु असलेल्या पावसामुळे ब्रिटीशकालीन भाटघर धरणात शुक्रवारी सायंकाळी ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे.पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील चार-पाच दिवसांमध्ये धरण १०० टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुधवारपासून सुरु झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या धरणात सायंकाळी ४ वाजेपर्तंय भाटघर धरणात ९१.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. भाटघर धरणाच्या दरवाज्यांच्या फटीतून पाणी पडण्यास सुरुवात झाल्याने परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे.गेल्या वर्षी याच दिवशी धरणात केवळ ६७ टक्के पाणीसाठा होता.
नीरा धरण साखळीतील नीरा-देवघर, गुंजवणी आणि वीर या धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. नीरा धरण साखळीतील सर्वाधिक २२.७४ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या भाटघर धरणात १५ जुलैला ९१.६४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तालुक्यातील ११.९२ टीएमसी पाणीसाठा असलेल्या नीरा-देवघर धरणात ७७.८५ टक्के पाणीसाठा आहे, गेल्या वर्षी हा ६० टक्के होता.
तर राजगड तालुक्यातील ३.७ टीएमसी पाणीसाठा असलेल्या गुंजवणी धरणात ७१ टक्के पाणीसाठा आहे. या तीनही धरणांमधील पाणी वीर धरणात जात आहे. वीर धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असूनही धरणात ८६.५७ टक्के पाणीसाठा आहे. गुंजवणी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून २५० क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सद्यस्थिती भाटघर, निरा-देवघर आणि वीर धरणातून विसर्ग सुरु नाही.
यावर्षी भाटघर धरण खो-यातील भूतोंडे परिसरात सर्वाधिक २ हजार ८३९ मिलीमिटर पाऊस पडला असून त्याखालोखाल कुरुंजी येथे २ हजार ६६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नीरा-देवघर धरण खो-यातील शिरगाव येथे २ हजार ४६५ मिमी पाऊस पडलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.