Rahul Gandhi : माझ्याकडून मोठी चूक झाली; राहुल गांधी यांनी भर सभेत मान्य केलं, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Rahul Gandhi on OBC Community : राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या भागिदारी न्याय संमेलनाला हजेरी लावली. या संमेलनात राहुल गांधींनी उपस्थितांना संबोधित केलं.
Rahul gandhi News
Rahul gandhi Saam tv
Published On

Rahul Gandhi : दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेसचं ओबीसी संमेलन सुरु आहे. या संमेलनात ओबीसींच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय भागिदारीविषयी चर्चा केली जात आहे. या संमेलनात राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.'दलित आणि आदिवासींच्या समस्या समजून घेणे सोपे आहे. परंतु ओबीसी समुदायाचे मुद्दे आणि समस्या समजून घेणे अवघड आहे. जातनिहाय जनगणना न करणे आमची चूक होती. आम्ही चूक सुधारत आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Rahul gandhi News
Buldhana News : कॅन्सरग्रस्त महिलेला त्रास दिला, मुलीशी गैरवर्तन; शिवसैनिकांनी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला चोपला

राहुल गांधी यांनी म्हटलं की, 'मी २००४ सालापासून राजकारणात आहे. मी मागे वळून पाहतो, तेव्हा मी अनेक चुका केल्याचे आढळून येते. सर्वात मोठी चूक ओबीसी समुदायाबाबत केली. ओबीसी समुदायाचं संरक्षण करायला हवं होतं, तसं संरक्षण करता आलं नाही. मी ओबीसी समुदायांचे मुद्दे सखोलपणे समजू शकलो नाही'.

'ओबीसी समुदायाचा इतिहास, संघर्ष, मुद्दे आणि समस्या ठाऊक असत्या, तर आम्ही कधीच जातनिहाय जनगणना केली असती. ही चूक काँग्रेसकडून नाही, तर माझ्याकडून झाली आहे. मी चूक सुधारण्याच्या मार्गावर आहे, असेही ते म्हणाले.

Rahul gandhi News
Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का;बडा नेता भाजपच्या वाटेवर, राजकीय समीकरण बदलणार

'दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेसचं ओबीसी संमेलनाचं उद्घाटन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं. तर समारोप राहुल गांधी यांनी केला. या संमेलनाला काँग्रेस खासदार प्रियंका गांधी,छत्तीसढचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमैया, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि हरियाणाचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा आदी नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली.

Rahul gandhi News
Tragic Accident : मुसळधार पावसाचा फटका, शाळेचं छत कोसळून मोठी दुर्घटना,६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

दरम्यान, संमेलनात ओबीसी समुदायासाठी २७ टक्के राजकीय आरक्षण, स्वातंत्र्य ओबीसी मंत्रालय आणि शैक्षणिक संस्थेत शिक्षणाची मागणी केली. या संमेलनात मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com