Buldhana News : कॅन्सरग्रस्त महिलेला त्रास दिला, मुलीशी गैरवर्तन; शिवसैनिकांनी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला चोपला

buldhana News update : कॅन्सरग्रस्त महिलेला त्रास देऊन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला चोपल्याची घटना घडली आहे.
buldhana News update
buldhana News Saam tv
Published On
Summary

महाविद्यालयातील कर्मचाऱ्याने निवृत्त महिला कर्मचाऱ्याकडून वैद्यकीय बिलासाठी लाच मागितली.

सेवानिवृत्त महिला कॅन्सरग्रस्त आहेत. त्यांना तातडीने मदत हवी होती.

कर्मचाऱ्याने महिलेच्या मुलीशी गैरवर्तन केल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चोप दिला

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाण्यात एका महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे. सेवानिवृत महिला कर्मचाऱ्याच्या बिलासाठी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्याला शिवसेनेने दणका दिला आहे. सेवानिवृत्त महिला कर्मचारीच्या मुलीला शिवीगाळ करत गैरवर्तन केले, यानंतर शिवसैनिकांनी कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. हा कर्मचारी मेडिकल बिलासाठी 25 हजार रुपये मागत होता.

buldhana News update
Eknath Shinde : 'शेतकरी भिकारी नसून...' म्हणणाऱ्या कोकाटेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? वाचा

बुलढाण्यातील खामगाव येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या महिला महाविद्यातील एका कर्मचाऱ्याला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिलाय.जयेश नागडा असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची आई या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाल्या आहेत. मात्र त्यांचे मेडिकल खर्चाचे बिल काढण्यासाठी जयेश नागडा याने वेळोवेळी मागणी केली. तर सध्या सेवानिवृत महिला कर्मचारी कॅन्सर आजारानं ग्रस्त असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

buldhana News update
Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का;बडा नेता भाजपच्या वाटेवर, राजकीय समीकरण बदलणार

सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याला उपचारासाठी पैसे हवे होते. मात्र, कर्मचारी जयेश बिलासाठी पत्र देत नव्हता. या सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्याने त्याला आतापर्यंत दोन लाख रूपये देखील दिले. तरीसुद्धा जयेशची भूक आणखी वाढल्याने तो सतत मेडिकल बिल काढण्यासाठी पैसे मागत होता. यावेळी सुद्धा 25 हजार रुपये दिल्यावर बिल काढण्यासाठी पत्र देतो म्हणाला.

buldhana News update
Husband Wife Clash : बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये, अचानक नवऱ्याची एन्ट्री; पुढे काय घडलं? वाचा

कर्मचाऱ्याने सेवानिवृत्त कर्मचारी महिलेच्या मुलीला अश्लील शिवीगाळ करत गैरवर्तन केले. तुझ्याकडून काय होते ते करून घे असेही म्हणाला. ही बाब शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर पडताच पदाधिकारी यांनी महाविद्यालयात जाऊन अगोदर संपूर्ण चौकशी केली. मात्र कर्मचारी जयेश नागडा याने उद्धट बोलत असल्याचे पाहून शिवसैनिकांनी त्यांना चांगलाच चोप दिलाय. यावेळी महाविद्यालयात खळबळ उडालीय. यानंतर जयेशने तत्काळ बिल काढण्यासाठी पत्र सुद्धा दिलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com