Modi Government : मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याला मोठा धक्का; पक्षातील ३८ नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

chirag paswan News : मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील ३८ नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
chirag paswan news
chirag paswan Saam tv
Published On
Summary

लोजपाच्या ३८ पदाधिकाऱ्यांनी चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली पक्ष सोडला आहे.

खडगिया जिल्हाध्यक्षपदी मनीष कुमार यांची नियुक्ती ही नाराजीचे मुख्य कारण.

खासदार राजेश वर्मा यांच्या हस्तक्षेपावरून ही नेमणूक झाल्याचा आरोप.

राजीनामा देणाऱ्यांनी खुलं पत्र लिहून पक्षातील अन्यायकारक वागणूक उघड केली.

लोक जनशक्ति पार्टी(रामविलास)चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील ३८ नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यात प्रदेश महासचिव रतन महासचिव यांचाही समावेश आहे. खासदार राजेश वर्मा यांच्या वागणुकीला कंटाळून राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.

chirag paswan news
Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का;बडा नेता भाजपच्या वाटेवर, राजकीय समीकरण बदलणार

लोक जनशक्ति पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी यांनी मनीष कुमार उर्फ नाटा सिंह यांना २३ जुलै रोजी पक्षात जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर खासदार राजेश वर्मा यांच्या सांगण्यावरून ही नियुक्ती करण्यात आली. या नंतर पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या पदाचा राजीनामा दिला. या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अध्यक्षांना एक खुलं पत्र देखील लिहिलं. त्यात पदाधिकाऱ्यांनी नाराजी सांगितली आहे.

chirag paswan news
jalna Shocking : जालना हादरलं! आश्रम शाळेत मध्यरात्री 8 वर्षांच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

नवे जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात खासदार राजेश वर्मा यांच्या खडगिया मतदारसंघात एक बैठक आयोजित केली. या बैठकीत लोजपाच्या ३८ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये माजी जिल्हाध्यक्ष शिवराज यादव, प्रदेश महासचिव रतन पासवान,युवा जिल्हाध्यक्ष सुजीत पासवान यांच्यासहित अनेक नेत्यांचा समावेश आहे. राजीनामा देताना एक पत्रक देखील जारी केलं.

पत्रात म्हटलं की, 'लोजपाचे संस्थापक दिवंगत रामविलास पासवान यांचा खडगिया हा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात पक्षातील नेत्यांसोबत चुकीचा व्यवहार केला जात आहे. पवन जायसवाल यांनी म्हटलं की, 'मनीष कुमार यांना जिल्हाध्यक्ष करण्याचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाचा आहे. काही लोक स्वार्थापोटी वक्तव्य करत आहेत. पक्षातील वरिष्ठांना याबाबत माहिती दिली जात आहे.

chirag paswan news
Husband Wife Clash : बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये, अचानक नवऱ्याची एन्ट्री; पुढे काय घडलं? वाचा
Q

लोजपा पक्षातील ३८ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा का दिला?

A

खासदार राजेश वर्मा यांच्या सूचनेवरून मनीष कुमार यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला.

Q

राजीनामा देणाऱ्यांमध्ये कोणकोण होते?

A

माजी जिल्हाध्यक्ष शिवराज यादव, प्रदेश महासचिव रतन पासवान, युवा जिल्हाध्यक्ष सुजीत पासवान यांच्यासह अनेक नेते यात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com