
संजय गडदे, साम टीव्ही
स्वतःच्या सोयीसाठी संपूर्ण परिसरातील नागरिकांचा श्वास रोखणारी संतापजनक घटना मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला मार्केट परिसरात घडली. एका बेफिकीर वाहनचालकाने मुख्य रस्त्यावरच आपली चारचाकी उभी केली. त्यानंतर खरेदीसाठी निवांत निघून गेला. विशेष म्हणजे, त्याने गाडीची ड्रायव्हर सीट आपल्या पाळीव श्वानासाठी आरक्षित केली होती.
गाडी रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे संपूर्ण लोखंडवाला परिसरात वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. शाळेतून घराकडे निघालेले विद्यार्थी आणि कार्यालयातून घराकडे निघालेल्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रुग्णवाहिकांनाही मार्ग मोकळा न मिळाल्यामुळे संतप्त नागरिकांनी या बेदरकारपणाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
मुंबईसारख्या वाहतूकबाधित शहरात रस्त्यावर अशी बेजबाबदारपणे गाडी पार्क करणे म्हणजे इतरांच्या वेळेचा, संयमाचा आणि सहनशीलतेचा केलेला अपमान आहे. वाहन चालकाची मानसिकता समजून न घेता नागरिक थेट पोलिसांकडे तक्रार करू लागले आहेत.
घटनेनंतर काही वेळाने वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गाडी हटवण्यात आली, मात्र वाहनचालकावर कायदेशीर कारवाई झाली की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे या प्रकाराची गंभीर नोंद घेण्याची आणि संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.