Narendra Modi : सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन नाही हे दुर्भाग्य; PM मोदींच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक, VIDEO

Narendra Modi on operator sindoor : संसदेतील ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे.
PM narendra modi speech
PM narendra modi Saam tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'भारतीय सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसने समर्थन दिलं नाही. पहलगामच्या हल्ल्यानंतर हे लोक उड्या मारत होते. त्यांना भारताच्या सैन्यावर विश्वास नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर तोफ डागली.

ऑपरेशन सिंदूरवरून लोकसभेत चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांवर निशाणा साधला. अमित शहा यांच्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा भारतासाठी गौरवाची बाब आहे. संसदेतील सत्र भारताचा विजयोत्सव आहे. हे सत्र दहशतवाद्यांना मातीत गाडण्याचा विजयोत्सव आहे. मी संसदेत भारताची बाजू मांडायला उभा राहिलो आहे. ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना आरसा दाखवायला उभा आहे'.

'देशात दंगली घडवण्याचं षडयंत्र रचण्यात आलं होतं. निष्पाप नागरिकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्या. मात्र, भारतीयांनी षडयंत्र मोडित काढलं. मी २२ एप्रिल रोजी परदेशात होतो. परदेशातून परतल्यानंतर तातडीने बैठक बोलावली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या आकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या सूचना दिल्या, असे मोदी पुढे म्हणाले.

'दहशतवादी आणि त्यांचा आकांना मातीत गाडण्याचा संकल्प केला. आम्हाला सैन्याच्या सामर्थ्यांवर विश्वास होता. आम्ही त्यांना खुली सुट दिली होती. दहशतवाद्यांच्या आकांना अंदाजही नव्हता की, भारत कारवाई करेल. पाकिस्तानातून न्यूक्लियर हल्ल्याची धमक्या मिळत होत्या. आम्हाला गर्व आहे की, ६ आणि ७ मे रोजी आम्ही निश्चय करून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. आपण हल्ला केल्यानंतरही पाकिस्तान काहीच करु शकला नाही. भारताच्या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांच्या आकांची झोप उडाली, असेही ते म्हणाले.

PM narendra modi speech
Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

नरेंद मोदी म्हणाले,' जगातील कोणत्याही देशाने कारवाई करण्यासाठी रोखलं नाही. यूएनमधील १९३ देशांपैकी फक्त ३ देशांनी पाकिस्तानचं समर्थन दिलं होतं. क्वॉड, ब्रिक्स आणि जगभरातील देशांनी भारताला समर्थन दिलं. जगाचं समर्थन मिळालं, परंतु भारतीय सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसने समर्थन दिलं नाही. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर तीन-चार दिवस हे लोक उड्या मारत होते. यांना भारताच्या सैन्यावर विश्वास नाही. या भूमिकांमुळे त्यांना हेडलाईनमध्ये जागा मिळेल, पण भारतीयांच्या हृदयात स्थान मिळणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com