Pune Rave party Case
Pune Rave party Case update Saam tv

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Pune Rave party Case update : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी पोलिसांंवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांवर आरोप केल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Published on
Summary

पुण्यातील रेव्ह पार्टीमुळे राजकीय वातावरण तापलंय.

आमदार एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर खासगी व्हिडिओ लीक केल्याचा गंभीर आरोप केलाय.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हिडिओ लीकचा आरोप फेटाळला आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टीवरून राजकारण तापलं आहे. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्राजंल खेवलकर यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांना खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल देखील एकनाथ खडसे यांनी पोलिसांना विचारला. एकनाथ खडसे यांच्या आरोपानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी उत्तर दिलं.

Pune Rave party Case
Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण राजकीय वर्तुळात गाजत आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दुसरीकडे पुणे पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे.

या कारवाईदरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मोठं भाष्य केलं. एकनाथ खडसे यांच्या कारवाईवर पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, 'जी कारवाई झाली, त्याची विस्तृत माहिती दिली आहे. पारदर्शरक आणि कायदेशीर कारवाई होईल. कोणीही पोलिस दलावर शंका ठेवायची गरज नाही. कोणत्याही प्रकाराचा फोटो आणि व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेला नाही'.

Pune Rave party Case
Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

'पोलिस ठाण्याच्या आतमध्ये देखील रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही. आम्ही काही लीक करत नाही, जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतील, त्याला थांबवू शकत नाही. कोणताही व्हिडिओ पोलिसांकडून लीक झालेला नाही, असे स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं.

Pune Rave party Case
Divya Deshmukh : 'बुद्धीबळाची राणी' दिव्यावर पैशांचा वर्षाव; 'वर्ल्ड चॅम्पियन'ला किती रक्कम मिळाली? वाचा

माजी गृहमंत्री काय म्हणाले?

खराडी रेव्ह पार्टी प्रकरणावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, 'एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. पार्टी ही त्यांच्या घरात झाली. पार्टीमध्ये सहा ते सात लोक होते. तसेच रेव्ह पार्टीमध्ये 50-60 लोक असतात. आता पोलीस चौकशी करून योग्य ती कारवाई करतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com