Malegaon Blast Case : दहशतवाद कधीच भगवा नव्हता; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसहित कोण काय म्हणालं?

Malegaon blast case update : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरील निकालावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Devendra fadnavis News
Devendra fadnavis Saam tv
Published On

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दाखल खटल्याचा गुरुवारी निकाल लागलाय. या प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. देशात दहशतवाद भगवा कधीही नव्हता अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत. या प्रकरणावर कोणी-काय प्रतिक्रिया दिली, जाणून घेऊयात.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज गुरुवारी एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज गुरुवारी निकाल सुनावला. या प्रकरणात एनआयए अनेक आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरली. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. 'दहशतवाद कधीच भगवा नव्हता, नाही आणि कधीच होणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

Devendra fadnavis News
Mahadev Jankar : भाजपसोबतची युती सर्वात मोठी चूक; महादेव जानकरांनी मनातलं सगळंच सांगितलं

दहशतवादाचा रंग हिरवा - नितेश राणे

मालेगाव प्रकरणावर मंत्री नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. 'हिंदू समाजाला बदनामी करण्याची हिंमत कुणी करु नये. दहशतवाद आणि जिहादचा रंग हा हिरवा आहे. हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या काळात खोट्या केस टाकण्यात आल्या. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला, असे राणेंनी म्हटलं.

Devendra fadnavis News
ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

हे गृहखात्याचं अपयश - अरविंद सावंत

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी गृहखात्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला, त्यातील सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गुन्हेगार नसताना १९ वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पोलिसांना आरोपी सापडत नाही. मला तपासाची चिंता वाटत आहे. हे गृहखात्याचं अपयश आहे', असे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

Devendra fadnavis News
Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

असदुद्दीन ओवैसी यांचं निकालावर प्रश्नचिन्ह

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं. 'एनआयए सांगत आहे की, दोघे जण सापडले नाहीत. मला समजत नाही, मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातही एका महिलेच्या नावावर गाडी होती. तिला गाडी चालवता येत नव्हती. तिला दोषी ठरवलं. रोहिणी सालियन यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. या सर्व प्रकरणाचे आरोपी कोणालाच माहिती नाही, असे त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com