
अक्षय गवळी, साम टीव्ही
भाजपसोबत युती करणे ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक असल्याचं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केलंय. ते अकोल्यात बोलत होतेय. जानकर पक्षाच्या एका बैठकीसाठी अकोल्यात आले होतेय. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केलाय.
भाजपला पराभूत करण्यासाठी भाजप सोडून कोणाशीही युती करण्यासाठी आपण तयार असल्याचे जानकर म्हटलंय. आता भाजपची काँग्रेस झाल्याचंही ते म्हटलं. इतर पक्षातील बदनाम आणि भ्रष्टाचारी नेत्यांना दबाव टाकून आपल्या पक्षात आणायचं आणि पक्ष मोठं करायचा असं भाजपचे धोरण असल्याचं ते म्हणालेय.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जिथे शक्य झालं तिथे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, मनसे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचं ते म्हणाले. ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही, त्या ठिकाणी पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय.
भाजपला पराभूत करण्यासाठी भविष्यात राजू शेट्टी, बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्ष यांसह रविकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जानकर म्हटलंय. 2019 मध्ये लोकसभा लढणार असून यापुढे केंद्राच्याच राजकारणात राहणार असल्याचे ते म्हणाले. यापुढे केंद्रातच मंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, आपला पक्ष डिमांडर नाही तर कमांडर असल्याचं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्ते आहेत. तर आपण नेते आहोत. आपल्यामुळे आपली बहीण पंकजा मुंडे कधीही अडचणीत येणार नाही, हा आपला प्रयत्न असल्याचं ते म्हटलं. बहिणीने दिल्या घरी सुखी राहावं, अशा शुभेच्छा त्यांनी पंकजा मुंडे यांना दिल्या. आधी निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आपला राजकीय संघर्ष उद्धव ठाकरेंशी होत होता. मात्र, आता आपण उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि काँग्रेस एकत्र आल्याचं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.