Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त | VIDEO

Justice After 17 Years : १७ वर्षांनंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात लागला. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. "केवळ संशयाच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येत नाही," असं स्पष्ट करत न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष सुटका जाहीर केली आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले होते.

या स्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली होती आणि अनेक संशयितांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती.आज तब्बल १७ वर्षांनंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात लागला. न्यायालयाने पुराव्याअभावी आणि केवळ संशयावर आधारित कारवाई न करता, न्यायाच्या तत्त्वांना प्राधान्य दिलं आणि सर्व आरोपींची मुक्तता केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com