WIFE AND LOVER KILLED HUSBAND IN KASGANJ Saam tv News
देश विदेश

Shocking: हँडसम तरूणावर ९ मुलांची आई फिदा, बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याचा काटा काढला; वीटभट्टीवरच संपवलं

Woman and Lover Brutally Kill Husband: कासगंजमध्ये ९ मुलांची आई प्रियकरासोबत पतीची निर्घृण हत्या करून फरार झाली. वीटभट्टीवर मृतदेह सापडला. पोलिस तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येतो आहे.

Bhagyashree Kamble

नवरा बायकोच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील कासगंजमधून उघडकीस आली आहे. ९ मुलांच्या आईनं प्रियकरासह तिच्याच पतीची निर्घृण हत्या केली आहे. वीटभट्टीवर पतीची हत्या करत त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिला. या घटनेनंतर आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

ही धक्कादायक घटना पटियाली पोलीस स्टेशन परिसरातील भरगेन गावात घडली आहे. रतिमान नट असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर रीना असे आरोपी पत्नीचे नाव असून, हनीफ असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. रीना आणि रतिमान या दोघांना मिळून ९ मुले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रतिमान या व्यक्तीचा मृतदेह काही गावकऱ्यांना वीटभट्टीवर आढळला. गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस तपासात असे दिसून आले की, मृत व्यक्तीच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत अवैध संबंध होते. याची माहिती पतीला कळताच दोघांमध्ये बाचाबाची झाली. घरात सतत सुरू असलेल्या भांडणाला कंटाळून पत्नीने पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. पत्नी आणि तिचा प्रियकर हनीफने प्लान रचला. प्लाननुसार दोघांनी रतिमानची वीटभट्टीवर हत्या केली.

हत्येनंतर रीना तिच्या ९ मुलांना सोडून फरार झाली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. तसेच तपासाला सुरूवात केली. तपासात मृत झालेल्या व्यक्तीच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून हत्या केल्याची माहिती समोर आली. सध्या पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध घेण्यात येत असून, या कटात इतर कुणाचा सहभाग होता का? याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT