Belgaum: मठात मध्यरात्री जोरदार राडा; स्वामींच्या खोलीत रात्री महिलेला बघितल्यानं गावकऱ्यांनी घातला गोंधळ

Swami Caught With Woman: शिवापूर (बेळगाव) येथे सिद्धेश्वर मठात स्वामीजी एका महिलेसोबत रात्री पकडले गेल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत त्यांना मठातून हकालून लावले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
Belgaon Math chaos
Belgaon Math chaosSaam TV News
Published On

बेळगावच्या शिवापूर गावातील सिद्धेश्वर मठातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्यावेळेस मठात अडवी सिद्धराम स्वामी यांना महिलेसोबत रंगेहाथ पकडलं. गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. १० ते १५ जणांनी मिळून स्वाजींना याचा जाब विचारला. तसेच मठाबाहेर एकच गोंधळ घातला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर स्वामीजींना तातडीने मठातून हकालपट्टी केली.

घटनेच्या दिवशी एक महिला आपल्या मुलीसोबत सिद्धेश्ववर मठात पोहोचली. रात्री उशीरा एका गावकऱ्याला स्वामीजींच्या खोलीत महिला आणि तिची मुलगी दिसली. त्याने ही माहिती गावकऱ्यांमध्ये पसरवली. गावातील लोकांनी तातडीने मठाच्या दिशेनं धाव घेतली. ग्रामस्थांनी मठाचा दरवाजा तोडत स्वामीजींना याचा जाब विचारला. तसेच महिला आणि लेकीजवळ घेराव घातला. त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केलं.

Belgaon Math chaos
Scheme: महिन्याला ₹५००० गुंतवा अन् लखपती व्हा; पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्किम करेल मालामाल

यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी धाव घेतल्यामुळे खोलीत असलेली महिला आणि मुलगी प्रचंड घाबरली. यादरम्यान, काहींनी व्हिडिओ शूट करून शेअर केला. मठाजवळ मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झाल्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वामीजींनी, आपण कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचं सांगितलं. महिला आणि मुलगी दूर गावावरून आले असल्यामुळे त्यांना मठात आश्रय दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

Belgaon Math chaos
Shocking: देखण्या सुनेवर सासऱ्याचा डोळा, चॅटिंग करत प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं; शेवटी पळून जाऊन लग्न उरकलं

या घटनेनंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या लेकीला सांत्वन केंद्रात हलवले. दुसऱ्या दिवशी स्वामी आणि ग्रामस्थांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीस ग्रामस्थांनी स्वामींना मठ सोडून जाण्यास सांगितले. अखेर ग्रामस्थांचा रोष पाहून स्वामींनी मठ सोडल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com