
सासरा आणि सूनेचं नातं बाप लेकीप्रमाणे असतं. पण याच नात्याला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून समोर येत आहे. होणाऱ्या सुनेला तिच्या सासऱ्यानेच पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. पळवून नेलं तसेच तिच्यासोबत लग्नगाठ बांधली. या घटनेमुळे मुलाचं लग्न मोडलं. तसेच आईला मोठा धक्का बसला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
सासरा आणि मुलीचं नातं निखळ असतं. पण काही लोकं नातेसंबंधाच्या मर्यादा ओलांडतात. रामपूरच्या बासनगलीमध्ये सासऱ्याने सूनेला पळवून तिच्यासोबत लग्न केलं. शकील असे सासऱ्याचे नाव असून, त्याने आपल्या मुलाचे म्हणजेच झबीनाचे लग्न एका मुलीसोबत लावून दिलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, शकीलचा मुलगा हा अल्पवयीन होता.
लहान वयात मुलाचं लग्न लावून देऊ नये, असं कुटुंबाचं मत होतं. यानंतर शकीलने लग्नाला विरोध करणाऱ्या पत्नीवर हात उगारला. तसेच मुलावर दबाव आणत त्याला शोधलेल्या मुलीसोबत लग्नासाठी तयार केलं. शकीलच्या मुलाचं एका मुलीसोबत लग्न ठरलं, पण याठिकाणी एक ट्विस्ट आला. होणारा नवरा ऐवजी शकीलच आपल्या सुनेसोबत गप्पा मारत बसायचा. दोघांमध्ये दिवसरात्र गप्पा सुरू असायच्या.
ही बाब समोर आल्यानंतर शकीलच्या पत्नीने विरोध केला. हे चुकीचं असल्याचं सांगितलं. पण नियमित सुरू असलेल्या संवादामुळे त्यांच्यातील प्रेम बहरत गेलं. त्या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करायचं ठरवलं. ही गोष्ट जेव्हा शकीलच्या मुलाला समजली, तेव्हा त्याने लग्न करण्यास नकार दिला. काही दिवसात शकील घरातले पैसे आणि दागिने घेऊन फरार झाला. त्याने सुनेसोबत म्हणजेच झबीनासोबत लग्नगाठ बांधली.
या गोष्टीमुळे शकीलची बायको नाराज झाली. तिला सूनऐवजी सवत मिळाली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.