आधी मैत्री अन् फ्लर्टिंग, पण शरीरसंबंध.., मोसादच्या फिमेल एजंट नेमकं कसं जाळ्यात अडकवतात? | Mossad

Mossad Women Warriors: मोसादच्या महिला गुप्तहेरांनी सौंदर्याचा वापर करत इराणच्या शास्त्रज्ञांवर निशाणा साधला. गोपनीय मिशन, बुद्धिमत्ता, धाडस आणि देशासाठी जीव धोक्यात घालणारी महिलांची यंत्रणा!
Mossad Warrior
Mossad WarriorSaam TV News
Published On

इस्त्रायल विरूद्ध इराण या दोन देशातील वाद अद्याप शमलेला नाही. दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. एकमेकांवर जोरदार हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत. अशातच इस्त्रायलने मोसाद नावाचं प्यादं काढत इराणच्या ९ वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांना टार्गेट केलं. विशेष म्हणजे हे सर्व अगदी गुप्तपणे पार पडलं की इराणच्या गुप्तचर यंत्रणेलाही काहीच सुगावा लागला नाही. पण मोसादच्या महिला ब्रिगेड नेमक्या असतात तरी कोण? या महिला एखाद्याची शिकार तरी कशा पद्धतीने करतात? जाणून घेऊयात.

इस्त्रायली गुप्तचर संस्था अर्थात मोसाद ही अचूकपणे काम करणारी एजन्सी आहे. जगाच्या कोणत्याही बिळात लपलेला शत्रु असूदे, त्याला शोधून आपल्या मायेच्या जाळ्यात ओढण्याचं काम महिला ब्रिगेड अगदी सहजतेनं करतात. त्यांचं आयुष्य एखाद्या सिनेमासारखं असतं. या महिला ब्रिगेड खरंतर ब्यूटी विथ ब्रेन असतात. देशासाठी मिशन पार पाडण्यासाठी आपल्या सौंदर्याचा पुरेपूर वापर करून घेतात.

Mossad Warrior
गॅसच्या किमतीचा भडका उडणार? फक्त १६ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक, इराण इस्त्रायल युद्धाच्या झळा बसणार | LPG

टाईम्स ऑफ इस्त्रायलमधील एका रिपोर्टनुसार, महिला जेव्हा मिशनवर असतात, त्यावेळी त्यांच्यावर काही मर्यादा लादल्या जातात. या मर्यादा पाळून त्यांना मिशन पूर्ण करावं लागतं. महिला ब्रिगेड आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेच्या कर्तव्यासाठी घालवतात. एका फिमेल एजंटने सीक्रेट सर्विसदरम्यान काय करावं लागतं याची माहिती दिली आहे. मिशन पूर्ण करताना काही मर्यादा पाळाव्या लागतात. जोपर्यंत वरिष्ठांकडून ऑर्डर येत नाही, तोपर्यंत या महिलांना कोणतंही काम सांभाळून करतात.

एका महिला एजंट महिला अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, 'जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा काही प्रमाणात छेडछाड किंवा स्त्रीत्त्वाचा वापर योग्य मानला जातो. संवेदनशील क्षेत्रांमध्ये पुरूषांची उपस्थित संशयास्पद वाटू शकते, अशावेळी हसऱ्या आणि कॉण्फिडेंट महिलेला सहजपणे प्रवेश मिळतो', असं त्यांनी सांगितलं. तसेच या महिला अधिकारी केवळ कमांडर पदावरच नसून, अनेकदा त्याहून उच्च पदावर कार्यरत असतात. तसेच महत्त्वापूर्ण मोहिमांमध्ये सहभागी होतात.

Mossad Warrior
Pune rain: दमदार पाऊस! प्रमुख चार धरणं काठोकाठ भरली; पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली

दोस्ती फ्लर्ट अन्..

मिशन पूर्ण करण्यासाठी एजंट महिला स्त्रीत्वाचा पुरेपूर वापर करून घेतात. यासाठी त्या पुरूषांसोबत मैत्री करतात, फ्लर्ट करतात. त्यांच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याची वेळ येत नाही. सेक्स करण्यास मनाई असते, असं महिलेनं माहिती देताना सांगितलं. मोसादसाठी भरती करणं कठीण, पण पकडलं गेल्यास थेट मृत्यूही होऊ शकतो. पण देशासाठी हा धोका देखील त्या पत्कारतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com