Pune rain: दमदार पाऊस! प्रमुख चार धरणं काठोकाठ भरली; पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली

Punes Four Major Dams: गेल्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पुण्याच्या चारही प्रमुख धरणांमध्ये सध्या ३५.८३% पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे.
PUne rain
PUne rainSaam TV News
Published On

गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. पुण्याला चारही प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाची नोंद झाली असून, यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.

चारही धरणांमध्ये मिळून एकूण ३५.८३ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी याच दिवशी साठा केवळ १२.२८ टक्के होता. म्हणजे यंदा तब्बल २३ टक्क्यांनी अधिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता बऱ्यापैकी मिटली आहे.

PUne rain
गॅसच्या किमतीचा भडका उडणार? फक्त १६ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक, इराण इस्त्रायल युद्धाच्या झळा बसणार | LPG

धरणांनुसार सध्याचा पाणीसाठा

खडकवासला – 62.17%

पानशेत – 31.34%

वरसगाव – 40.44%

टेमघर – 18.78%

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार

नाशिकमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग जोरदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढत चालली आहे. दुपारी २ वाजेपासून गंगापूर धरणातून ६,१६० क्यूसेक वेगानं पाणी विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.

धरण परिसरात अजूनही पावसाची संततधार सुरू असून, पाण्याची आवक वाढत असल्यामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पाण्याचा थेट परिणाम नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या पाणी पातळीवर होणार असून, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

PUne rain
NCP: अजित पवारांचा शरद पवारांना झटका; उत्तर महाराष्ट्रातील बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घड्याळ बांधलं

साताऱ्यात कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. विशेषतः कण्हेर धरणात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने, धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. १०.११ टीएमसी पाणी साठवण असलेल्या या धरणात सध्या ५७ टक्के पाणीसाठा झालेला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता या धरणातून सध्या १५४० क्यूसेक एवढं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे वेण्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com