14 Years Old Boy Died Due To Heart Attack Saam Tv
देश विदेश

Heart Attack: धावण्याचा सराव करताना खाली कोसळला, परत उठलाच नाही; १४ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

14 Years Old Boy Died Due To Heart Attack: मोहित चौधरी आपल्या मित्रांसोबत धावण्याचा सराव करत होता. धावत असताना तो जमिनीवर कोसळला. हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Priya More

हार्ट अटॅकमुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. मोहित चौधरी असं या मुलाचे नाव असून तो शाळेत होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेसाठी सराव करत होता. शुक्रवारी सकाळी अलिगढ जिल्ह्यातल्या सिरौली गावामध्ये ही घटना घडली. या मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित चौधरी आपल्या मित्रांसोबत धावण्याचा सराव करत होता. धावत असताना तो जमिनीवर कोसळला. मोहितची प्रकृती बिघडल्याची माहिती त्याच्या मित्रांनी कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत मोहितला तात्काळ रुग्णालयात हलवले. पण डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले.

मोहितच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ७ तारखेला ही स्पर्धा होणार होती. पण या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच त्यांचा सराव करताना मृत्यू झाला. मोहितच्या वडिलांचा ऑगस्ट महिन्यांमध्येच रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला होता. वडिलांनंतर मुलाचा देखील मृत्यू झाल्यामुळे मोहितच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये अशीच एक घटना घडली होती. या घटनेत २० वर्षांच्या तरुणीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये गेल्या २५ दिवसांत ३ जणांनी हार्ट अटॅकने आपला जीव गमावला आहे. लोधीनगरमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. तर कामाला जाण्याासाठी निघालेल्या डॉक्टरचा देखील हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT