
सर्वांना हवी हवीशी गुलाबी थंडी सुरू झालीय. मात्र सावधान. हीच थंडी तुमचा जीव घेऊ शकते. कारण थंडीमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, असा दावा करण्यात आलाय आणि याच हार्ट अटॅकमुळे तुमचा मृत्यूच होऊ शकतो. नेमकी थंडी कशामुळे जीवघेणी ठरते याची आम्ही पडताळणी केली.नेमकं काय सत्य समोर आलं ते पाहूयात.
हिवाळा म्हटलं की गुलाबी थंडी. ही थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. मात्र हीच गुलाबी थंडी तुमच्या जीवावर उठू शकते. हिवाळ्यात तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. याबाबत सोशल मीडियात एक मेसेज तुफान व्हायरल होतोय. हिवाळ्यात तुम्हाला हार्ट अटॅक आल्यास तुमचा मृत्यू होऊ शकतो असा दावा करण्यात आलय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलय पाहुयात.
हिवाळ्यात तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढून हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅकमुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो. हा मेसेज व्हायरल होत असल्याने सोशल मीडियात खळबळ उडालीय. सर्वांच्या आरोग्याशी निगडित हा विषय असल्याने आमच्या टीमने या मेसेजची पडताळणी केली. आम्ही तज्ञांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा.
त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात. हिवाळ्यात शरीरातील उष्णता आवश्यक तितक्या प्रमाणात टिकवताना रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्त वाहताना अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो. लोक हिवाळ्यात खूप जास्त जेवण आणि कमी व्यायाम करतात. त्यामुळे हिवाळ्यात वजन वाढतं.
या कारणानेही रक्तदाब वाढू शकतो. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्यास. रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. विशेष म्हणजे भारतीयांच्या आरोग्याबाबत अमेरिकेतही एक धक्कादायक अहवाल प्रकाशीत झालाय. त्यानुसार 2015 मध्ये भारतात जवळपास 6.2 कोटी लोक ह्रदयविकाराने त्रस्त होते.यातील 2.3 कोटी रुग्ण हे 40 वर्षांच्या आतील होते. लांसेटच्या अहवालानुसार 2016 मध्ये हा आकडा 28 टक्क्यांनी वाढला होता.
त्यामुळे आमच्या पडताळणीत हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका अधिक असल्याचा दावा सत्य ठरलाय. हिवाळ्यात आरोग्याची काळजी घ्या, रक्तदाबासंदर्भात तक्रार असल्यास तत्काळ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.