Death during shunting operation : रेल्वेच्या शंटिंग ऑपरेशन दरम्यान कर्मचाऱ्याचा चिरडून मृत्यू, अपघातामध्ये नेमकी चूक कोणाची?

baraini railway: 25 वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचा शंटिंग ऑपरेशन दरम्यान इंजिन आणि कोचच्या बफरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला.
 baraini railway
Death during shunting operation yandex
Published On

25 वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचा शंटिंग ऑपरेशन दरम्यान इंजिन आणि कोचच्या बफरमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी बिहारच्या बरौनी जंक्शन स्थानकात घडली. बफर हे ट्रेनच्या इंजिन आणि कोचच्या दोन्ही टोकांवर शॉक शोषून घेणारे यंत्र आहे, जे बोगींमधील धडकण्याचा प्रभाव कमी करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. लखनौ जंक्शन ते बरौनी एक्स्प्रेसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर शंटिंग ऑपरेशन दरम्यान ही घटना घडली. या घटनेची व्हिडिओ क्लिप शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली.

रेल्वे कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप

बरौनी जंक्शन स्थानकात घडलेल्या अपघातात मृत पावणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव अमर कुमार आहे. तो बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. या धक्कादायक घटनेमागे कुमारच्या कुटुंबीयांनी रेल्वे कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. 

घटनास्थळी पोहोचल्यावर, कुमारच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत चुकलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना मृत्यूसाठी जबाबदार धरले जात नाही तोपर्यंत त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास विरोध केला. काही काळासाठी येथे तणावपूर्ण परिस्थीती निर्माण झाली होती. सोनपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) विवेक भूषण सूद संतप्त कुटुंबीयांना शांत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. कुटूंबीयांची समजूत काढल्यानंतर कुटूंबीयांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.

 baraini railway
Onion Price Hike : दिल्ली-मुंबईकरांना कांद्याने रडवले; ५ वर्षांनंतर नोव्हेंबरमध्ये दर गगनाला भिडले, तुमच्या शहरात किती भाव?

पूर्व मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे कुमारचा जीवघेणा मृत्यू झाला असावा. ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्याचवेळी चिंतेची देखील बाब आहे असे तेम्हणाले. अशा ऑपरेशनसाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले गेले असावे अशी शक्यता सीपीआरओच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी शरस्वती चंद्रा यांनी व्यक्त केली.

अधिकाऱ्याने असेही सांगितले की कुमार यांच्या मृत्यूमागील कारणे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याकडून त्रुटी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. अशा घटना टाळ्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याची गरज आहे तसेच अनुभवी कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत या कामाचा सराव केल्यास अपघाताला आळा घालण्यात मदत होऊ शकते.

Edited By- नितीश गाडगे

 baraini railway
CJI Sanjiv Khanna : संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश, अशी आहे त्यांची कारकिर्द

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com