Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या एक महिन्याआधी मिळतात 'हे' संकेत; चुकूनही दुर्लक्ष करू नका अन्यथा...

silent heart attack symptoms : हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, अशा स्थितीत या घटनेच्या सुमारे एक महिना आधी आपले शरीर काही संकेत देऊ लागते, ज्याकडे आपण दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे.
heart attack symptoms
silent heart attack symptomsyandex
Published On

आजच्या काळात हृदयाशी संबंधित समस्या अधिक दिसून येत आहेत. पूर्वी ही समस्या फक्त प्रौढांमध्ये दिसून येत होती. मात्र आता तरुणांवरही याचा परिणाम होत आहे. हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर वैद्यकीय आणीबाणी आहे जी अनपेक्षितपणे येते. हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर आपल्याला चेतावणी देण्यास सुरुवात करते. हे वेळीच समजले तर आयुष्य वाढू शकते.

पूर्व चेतावणी चिन्हे जाणून घेतल्यास तुमचा जीव वाचू शकतात. हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी ही चिन्हे दिसू लागतात. पुढे काय लक्षण दिसतात यांची माहिती दिली आहे.

हृदयविकाराची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.

थकवा आणि अशक्तपणा

हृदयविकाराच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय थकवा आणि अशक्तपणा येणे. ही समस्या आपण सामान्य मानून त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र दैनंदिन काम, ताणतणाव किंवा पुरेशी झोप न मिळाल्यानेही थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. पण हा थकवा दीर्घकाळ राहिल्यास, हे हृदयाशी संबंधित गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते. त्यामुळे जर तुम्हाला दीर्घकाळ थकवा जाणवत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

heart attack symptoms
Joint Pain Home Remedies: सूज आणि सांधेदुखीचा त्रास झटकन होईल गायब, किचनमधील या पदार्थाचा आहारात करा समावेश

श्वास घेण्यास त्रास होणे

जर तुम्हाला दीर्घकाळ श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दैनंदिन काम करताना किंवा विश्रांती घेत असतानाही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. छातीत जडपणा आणि श्वासोच्छवासात बदल हे हृदयविकाराचे कारण असू शकते. तुम्हालाही छातीत दुखत असेल किंवा चक्कर येत असेल तर ताबडतोब रुग्णालयात जा.

छातीत अस्वस्थता

छातीत अस्वस्थता थेट हृदयाच्या समस्यांशी संबंधित आहे. या समस्येत लोकांना छातीत घट्टपणा किंवा दाब जाणवू शकतो. हा दाब हात, मान, जबडा किंवा पाठ यांसारख्या इतर अवयवांमध्ये पसरू शकतो. हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही आठवड्यांपूर्वी छातीत अस्वस्थता येऊ शकते.

अनियमित हृदयाचे ठोके

हृदयाचे ठोके अनियमित होत आहेत असे वाटत असेल तर त्याकडे त्वरित लक्ष द्या. हृदयाचे ठोके वेगवान असल्यास किंवा हृदयाचे ठोके खूप होत असल्यास ते धोकादायक आहे. हे सूचित करू शकते की तुमचे हृदय योग्यरित्या काम करत नाही.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

written by: sakshi jadhav

heart attack symptoms
Travel Special: 'ही' आहेत जगातील सर्वात छोटी विमानतळे, तुम्हाला याबद्दल माहिती आहे का?

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com