देश विदेश

Parliament winter Session: पाकव्याप्त काश्मीर भारतात असता...; अमित शहांनी लोकसभेत सांगितल्या नेहरूंनी केलेल्या दोन मोठ्या चुका

winter session: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जम्मू-काश्मीर, जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक-२०२३ आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक- २०२३ या दोन विधेयकांवर उत्तर दिलं.

Bharat Jadhav

Union Home Minister Amit Shah In Parliament winter session:

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल असून अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज होत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जम्मू-काश्मीर, जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक-२०२३ आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक- २०२३ या दोन विधेयकांवर उत्तर दिलं. या दरम्यान शाह यांनी पंडित नेहरू यांनी घेतलेल्या निर्णयावरून काँग्रेसवर निशाणा साधला.(Latest News)

पाकव्याप्त काश्मीरची समस्या दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू याच्यामुळे उपस्थित झाली. पूर्ण कश्मीर ताब्यात घेण्याआधीच त्यांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला, नाहीतर पीओके आज भारताचा भाग असता. नेहरु यांच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) बनलं,असं म्हणत शाह यांनी काँग्रेसवर टीका केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिल सादर करताना असताना अमित शाह यांनी नेहरू यांनी घोडचुका केल्याचं म्हटलं. जेव्हा युद्ध चालू होते त्यावेळी आपलं सैन्य जिंकत होते. सैन्य पंजाबच्या पुढे गेले त्यानंतर शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. त्यामुळे पीओकेचा जन्म झाला. जर शस्त्रसंधीचा निर्णय तीन दिवसानंतर घेतला असता तर पीओके आपल्या देशाचा भाग राहिला असता. पण तसं झालं नाही. ही नेहरूंची पहिली चूक होती.

तर दुसरी चूक म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी भारताचा अंतर्गत मुद्दा UN मध्ये नेला. या इतिहासातील घोडचुका असल्याचं शहा म्हणालेत. शाह यांनी केलेल्या विधानामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि लोकसभेत मांडले.

आता जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक आता लोकसभेत मंजूर झाले आहे. गेल्या ७० वर्षात काश्मीरमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना न्याय देण्यासाठी हे विधेयक सादर करण्यात आले आहेत. तर अनुच्छेद ३७० मुळे ४५ हजार लोकांचा जीव गेला, अशा यंत्रणेला आमच्या सरकारने तेथून काढून टाकले. काश्मिरी पंडितांना जेव्हा टार्गेट करण्यात येतं होतं, त्यावेळी त्यांना तेथून स्थलांत्तर करावे लागले होते.

काश्मिरी पंडितांना देशातील इतर भागात शरणार्थी सारखं राहवे लागले होते. विस्थापित काश्मिरी पंडितांना आरक्षण देऊन काय होणार? विरोधकांच्या या प्रश्नावर शाह यांनी उत्तर दिलं. काश्मिरी पंडितांना आरक्षण देऊन त्यांचा आवाज काश्मीर विधानसभेत ऐकू येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT