Sambhajiraje Chhatrapati, Manoj Jarange Patil, Maratha Reservation
Sambhajiraje Chhatrapati, Manoj Jarange Patil, Maratha ReservationSAAM TV

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे 'एक पाऊल पुढे'; महाराष्ट्रातील लोकसभा, राज्यसभा खासदारांना एकत्र आणणार

Maratha Reservation Latest News : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.
Published on

Sambhajiraje Chhatrapati Apealed on Maratha Reservation :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी 'एक पाऊल पुढे' टाकलं आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. तर राज्यात ठिकठिकाणी मराठा संघटनांच्या वतीने उपोषण आणि आंदोलने करण्यात आली. मनोज जरांगे यांच्याकडून राज्य सरकारला अल्टिमेटमही देण्यात आलेले आहे. मराठा आरक्षणासाठी आता संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे. ते लवकरच खासदारांची बैठक बोलावणार आहेत. ही बैठक दिल्लीत होणार आहे. तसेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यातील खासदारांनी उचलून धरावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Sambhajiraje Chhatrapati, Manoj Jarange Patil, Maratha Reservation
Manoj Jarange Patil News: सातबारा तुमच्या नावाने आहे का? भुजबळांच्या प्रश्नाला 7/12 तारखेला जरांगे देणार प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com