मनसे जिल्हाध्यक्ष राज पार्टे रायगडच्या खारपाडा टोल नाक्यावर आक्रमक
मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुक कोडी होऊन देखील टोल आकारणी सुरु असल्याने मनसे कार्यकर्त्यांची टोल वसुली कर्मचाऱ्यांवर आग पाखड
टोल वसुली बंद करीत गाड्या सोडल्या
०टोल नाक्यावरील वाहतुक कोंडीत रुग्णवाहिका आडकल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक
सिरोंचा तालुक्यातील गुमालकोंडा ग्रामपंचायत अंतर्गत मुत्तापूर पुलिया पाण्याखाली गेल्याने गुमालकोंडा, मुत्तापूर, सोमनूर, मुकीडिगुत्ता, जुना सोमनूर आणि नवीन सोमनूर ही सहा गावे पूर्णपणे संपर्काबाहेर गेली आहेत. वाहतूक ठप्प झाल्याने एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने ग्रामस्थांनी बैलबंडीच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या अलिबाग येथील महसुल विभागाच्या कार्यक्रमात नेत्यांमध्ये वाद. निमंत्रणाच्या मुद्द्यावरून मंत्री बावनकुळे यांनी मागितली माफी.
- नालासोपारा पूर्व येथील वाकणपाडा परिसरात २९ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली दुर्दैवी धक्कादायक घटना
- गटारात पडल्यानंतर पदचाऱ्याला बाहेर कडतानाचे सर्व थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- गटारात पडताच आरडाओरड झाल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ पादचाऱ्याला बाहेर काडल्याने त्याचा सुदैवाने जीव वाचला आहे
- नालासोपारा स्थानक ते मुंबई-अहमदाबाद महामार्ग जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाकणपाडा आणि धानीव बाग परिसरातील नाल्यात ही घटना घडली आहे
- रस्ते पूर्णपणे उखडले असून अनेक ठिकाणी दोन ते तीन फूट खोल खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी आणि चिखल साचल्याने रस्ता आणि गटार यामधील फरक ओळखणेही कठीण झाले आहे.
पलटी झाल्यानंतर ट्रकने घेतला पेट
गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता ट्रक
अपघातानंतर ट्रक जळून खाक
ट्रकने पेट घेतल्यानंतर ट्रक मधील चालक आणि क्लीनर दोघेही होरपळले
कोरफळलेल्या दोघांवरती रुग्णालयात उपचार सुरू
वाहतूक मात्र सुरळीत, अंजनारी घाटात मात्र बर्निंग ट्रकचा थरार
मुंबईहून मालेगावच्या दिशेने अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहीत मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळताच त्यांचे पथक व चांदवड पोलिसांच्या पथकाने चांदवड च्या मंगरूळ टोलनाक्यावर सापळा रचून गाडीची कसून तपासणी केली असता त्यामध्ये बंदी असलेले 'एमडी ड्रग्ज' आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ड्रग्ज आणि वाहनासह तीन आरोपींना ताब्यात घेतले.
सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग.
अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील पीपी टॉवेल कारखान्याला अज्ञात कारणाने लागली आग
पीपी टॉवेल कारखान्यातील बॉयलर शेजारी आग लागल्यामुळे धुराचे लोट पाहायला मिळाले..
सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू
टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीत कारखान्याचे नुकसान तर कोणतीही जीवितहानी नाही
- सनातन धर्माचा विरोध केल्याचा आरोप करत खासदार पप्पू यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने नागपुरात आंदोलन छेडले आहे.
- भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो शहराध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात बर्डीतील वेरायटी चौकात हे निषेध आंदोलन करणार आहे...
मागील तीन दिवसापासून नांदेडसह मराठवाड्यात दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी धरण 92 टक्के भरला आहे. विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह छत्रपती संभाजी नगर, जालना,परभणी या जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक वाढली आहे.मागच्या आठवड्यात विष्णुपुरी धरणात केवळ 33 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक राहिला होता. परंतु मागील दोन ते तीन दिवसापासून झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धरण 92 टक्के भरले असून नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील जोगलखेडे, मेहू, हनुमंतखेडे, देवगाव आणि मुंदाने परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना अभूतपूर्व पूर आला असून शेतजमीन खरडली गेली. पिकांसह ठिबक सिंचन, बैलगाड्या आणि शेतीची अवजारेही पाण्यात वाहून गेली. अनेक बंधाऱ्यांमध्ये झाडे अडकल्याने पाणी शेतात शिरले. बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
बीड येथील लाचखोर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड त्याच्या नांदेड येथील निवासस्थानी एसीबीने झाडाझडती घेतली. त्याच्या नांदेड येथील घरात एसीबीच्या पथकाला एक लाख सात हजार रुपये रोख , तीन तोळे सोने आणि शेत जमिनीची कागदपत्रे आढळली.त्याच्या बँक खात्याचे तपशील मात्र आढळले नाहीत
मंत्री पदाबाबत भरत गोगावले यांच मोठ विधान
आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी
मंत्रिपद नाकारणारा मी आमदार आहे
जनतेच्या हितासाठी अडीच वर्षे मंत्रिपद सोडले
उद्या सांगितलत राजीनामा द्या तर आपली राजीनामा देण्याची तयारी
माजलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात महापुरुष स्मारक बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाला शनिवारी आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
हतनुर धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर तापी नदीला मोठा पूर
पाणी पातळीत वाढ झाल्याने सारंखेडा आणि प्रकाशाबाहेरचे उघडले दरवाजे
प्रकाशा बॅरेजचे 32 तर सारंखेडा बॅरेजचे 22 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले
तापी नदीकाठचा गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेच्या इशारा
साकेगाव येथील बापू सोनवणे यांच्या शेतातील सोयाबीन तर दिगंबर कडू पाटील यांच्या शेतातील कपाशी पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून कपाशी सडण्याच्या मार्गावर आहे.
वांजोळे नदी दुथडी भरून वाहत असून तिचे पाणी वाघूर नदीत मिसळल्याने नदीपात्राला पूर आला आहे. अनेक लहान-मोठे नालेही तुडुंब भरून वाहत आहेत.
पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिराचे दरवाजे आजपासून पुन्हा भाविकांसाठी खुले झाले आहेत. पुरातत्त्व विभागाच्या जतन व संवर्धनाच्या कामांमुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद असलेले मंदिर आज पहाटे साडेपाच वाजल्यापासून दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहिल्याच दिवशी भाविकांनी श्री महागणपतींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
गणेश मळा परिसरात नाला फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या हाल होत आहेत.
नाला फुटल्याने पाणी घरामध्ये जात आहे. गणेश मळा, गणपती नगर, समता नगर परिसरातील घरांमध्ये नाला फुटल्याने पाणी जात आहे नागरिकांच्या हाल होताना पाहायला मिळतात.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भिमा नदीवरील बंधाऱ्यावर जीव धोक्यात घालून दुचाकी धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
आजच्या युवकांनी विचार करण्याची गरज आहे
आजच्या पुरस्काराबद्दल आभार,पुरसकर स्वीकारतो
स्वतंत्र म्हणजे आपल्याला जे करायचं आहे ते नाही
ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी काम केलं ,त्यावेळी आवाज उठवण्याचे हिंमत नव्हते,त्यांनी कठीण रस्ता स्वीकारत नेतृत्व केलं
नाशिकच्या खड्ड्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला दिल उत्तर
नाशिकच्या खड्या बाबत माझी काय जबाबदारी असा केला प्रतिप्रश्न
मी जरी मंत्री असलो तरी इथ महापालिका वेगळी यंत्रणा आहे
*कुंभमेळा कामासाठी समिती, आयुक्त आणि अधिकारी वेगळे आहेत
राऊत यांचे नगरसेवक देखील आहेत त्यांनी आवाज उठवला पाहिजे*
राऊत बोलत राहतात त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही
भोर येथे चालू असलेल्या सोलर विज उपकेंद्र कामावर एक ऑगस्ट रोजी पहाटे एक ते दीड वाजले सुमारास मोठ्या जमावाने हल्ला करत कामावरील कंपनीच्या मशिनरी वाहने जनरेटर इत्यादी साहित्यांची जाळपोळ करत तेथील निवासी कामगारांना त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेत फोडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. अज्ञात जमावावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
पुणे -
अमित शहा -
लोकमान्य टिळक निर्भीड पत्रकार होते
लोकामान्य टिळकांनी लोकांना एकत्रित आणले
टिळक सर्वांसाठी प्रेरणास्रोत्र
पुणे -
अमित शहा -
डोवालांच्या टिप्समुळे १३ बॉम्बस्फोट प्रकरणांचा उलगडा
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत अजित डोवालांचे मोठं योगदान
पुणे -
अमित शहांच्या हस्ते अजित डोवालांचा सन्मान
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रात मोठं योगदान
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख वसंत मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणार असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
वसंत मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेत स्वारगेट पोलीस चौकीत नेले आहे.
नाशिक -
- त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताखालील जांबाची वाडी धोक्यात
- कालपासून वाडीच्या वरील भागात डोंगरावर जमिनीला पडू लागल्या भेगा
- काही दिवसांपूर्वी याच भागात दरड कोसळल्याची देखील घडली होती घटना
- सततच्या पावसामुळे माती आणि दगड घरांमध्ये शिरल्याने घरांचे नुकसान
- जांबाची वाडीतील तब्बल 15 ते 20 घरांची लोकवस्ती धोक्यात
- स्थानिक नागरिकांनी केली प्रशासनाकडे मदतीची मागणी
पुणे -
वंचित बहुजन आघाडीने अडवला रस्ता
कार्यकर्त्यांनाे पोलिसांनी घेतलं ताब्यात
भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
मनसे वर्धापन दिन्नानिमित्त भाषण देताना चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचेत असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं. तसेच राजकारणाची सुरूवात तरुणांपासून झाली असंही ते म्हणाले.
शिवसेना उबाठा शहर प्रमुख वसंत मोरे पोलिसांच्या ताब्यात
आंदोलन करणार म्हणून अटक
स्वारगेट पोलीस चौकी
वसंत मोरे याना पोलिसांनी अटक केली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुरस्कार कार्यक्रम स्थळी पोहचले
अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण सोहळा
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार
पुण्यात महाराष्ट्र मंडळ स्वारगेट महर्षी नगर येथील मैदानावर कार्यक्रम पार पडणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,मंत्री चंद्रकात पाटील,मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक जण पुरस्काराला उपस्थितीत
लोणावळ्यात पुन्हा वरुणराजाने दमदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासांत तब्बल १२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगर-दऱ्या हिरवाईने नटल्या असून धबधबेही प्रवाहित झाले आहेत. निसर्गाने पुन्हा एकदा मनमोहक रूप धारण केल्याने पर्यटननगरी लोणावळा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून.
भोंदू अशोक खरात याला थोड्याच वेळात राहाता न्यायालयात करणार हजर..."
नाशिक कारागृहात असलेल्या खरात याला शिर्डी पोलिसांनी घेतले ताब्यात...
अशोक खरात याचा दुसऱ्यांदा घेतलाय शिर्डी पोलिसांनी ताबा...
यापूर्वी शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात केला होता तपास...
आता समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणी शिर्डी पोलिस करणार चौकशी...
57 व्यक्तींच्या नावे 100 हून अधिक बनावट खाते उघडल्याचे आले होते समोर...
ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत जून आणि जुलै या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नसल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर शहापूर पंचायत समितीसमोर विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांनी ‘ताटली मोर्चा’ काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शौर्यभूमीत भारताच्या चाणक्याचे स्वागत बॅनर काढला
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वागतासाठी लावलेल्या बॅनर वर टीका होत असल्याने बॅनर काढला
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपाकडून वेगवेगळी बॅनर बाजी करण्यात येत होती
सकाळपर्यंत असलेला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे शौर्यभूमीत चाणक्याचे स्वागत अशा प्रकारचे बॅनर लागले होते
वाशीमच्या शेलगाव शेतशिवारात नीलगायीच्या मोठ्या कळप शेतात घुसून कपाशीच मोठ नुकसान करतायेत...यंदा वेळेवर झालेल्या पावसामुळे कपाशीचे पीक चांगल्या जोमात आले असतानाच नीलगाईचे कळप शेतात घुसून हिरवीगार झाडे फस्त करत आहेत. त्यामुळे अनेक एकरांवरील पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे...
- एकमेकींना शिवीगाळ करत पाय तोडण्याची आणि जिवे मारण्याच्या धमक्या.
- नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांच्या दोन गटात हा वाद झाला.
- या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
- पोलिसात तक्रार नसल्याने अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही.
अमित शहा च्या दौऱ्यानंतर पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
पुण्यातील उत्सव बिल्डिंग परिसरात काँग्रेसचे आंदोलन
अमित शहा आहेत आज पुण्याच्या दौऱ्यावर
उत्सव चौकात काँग्रेस कार्यकर्ते जमले
जळगाव पूल रस्ता खचला शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून वाहतूक वळवली
पाळधी-तरसोद बायपासवरील आसोदा रेल्वे पुलावरील रस्त्याला मोठमोठ्या भेगा व भरावाच्या सिमेंटच्या प्लेट खचल्याचे वाहतूक शहरातील महामार्गावरून वळवण्यात आली
* नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती
* जिल्ह्यातील काही तालुक्यांना आज देण्यात आला आज रेड अलर्ट
* मालेगाव, कळवण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि बागलाण तालुक्यांना रेड अलर्ट
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात
अमित शहा यांच्या हस्ते आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपुरात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ
दुपारनंतर सखल भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरणार
प्रशासनाकडून 60 ते 70 कुटुंबांच्या स्थलांतराची तयारी सुरू
छत्रपती संभाजीनगर मनपाच्या 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
भाजपच्या 7 तर एमआयएमच्या 16 नगरसेवकांचा समावेश
पराभूत उमेदवारांच्या तक्रारीनंतर मनपा प्रशासनाची कारवाई
नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा गंभीर अपघात
जेलरोडवरील पवारवाडी येथे खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचा तोल गेला
अजित भालेराव गंभीर जखमी, डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत
एका खासगी हॉस्पिटलमध्ये डोक्याची शस्त्रक्रिया, प्रकृती गंभीर
अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
हिंगोली परभणी राज्य मार्गावर खड्ड्यात कार आदळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
ओमकार गिरे व श्रीधर ढेंबळे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे तर किशोर खरात हा तरुण गंभीर जखमी
शिर्डी पोलिसांनी पुन्हा घेतला भोंदू अशोक खरात याचा ताबा...
न्यायालयाच्या परवानगीने नाशिक कारागृहात असलेल्या खरात याचा घेतला ताबा...
समता पतसंस्थेतील बनावट खाती आणि कोट्यवधींच्या व्यवहार प्रकरणाच्या पुढील तपासासाठी शिर्डी पोलिसांनी घेतला भोंदू खरातचा ताबा.
- विदर्भात झालेल्या तुफान पावसामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू
- यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा लोणी मार्गावरील कुट्टी नदी पुलाजवळ कार वाहून गेल्याने आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला
- भंडारा आणि वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी एक जण वाहून गेल्याने दगावले
यवतमाळ जिल्ह्यात बारा तासात धुव्वाधार पाऊस
अनेक ठिकाणी पूरस्थिती
जिल्ह्यातील 16 ही तालुक्यात 518 घरांची पडझड
केंद्रीय मंत्री अमित शहा पुण्यात दाखल
मुख्यमंत्री यांनी केलं अमित शहा यांचे पुणे विमानतळावर स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार
सारसबाग जवळील पुतळ्याला अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
धुळे शहरातील पांजरा नदीवरीचा पूर वाढला,
शहरातील दोन पूल गेले पाण्याखाली
धुळे शहरासह जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीनंतर धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पुर आला
पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे धुळे शहरातील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत,
त्यामुळे हे दोनही पूल प्रशासनातर्फे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.