Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज वाढ झाली की घसरण? वाचा तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात आज बदल करण्यात आला आहे. तेल कंपन्यांनी नवे दर जारी केले आहेत. तुमच्या शहरातील आजचे दर घ्या जाणून..
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज वाढ झाली की घसरण? वाचा तुमच्या शहरातील दर
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On
  • १ ऑगस्ट रोजी पेट्रोल- डिझेलचे नवे दर जारी

  • काही राज्यात पेट्रोलचे दर वाढले तर काही ठिकाणी कमी झाले

  • तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात केला बदल

  • कच्च्या तेलाच्या किमतीचा पेट्रोलवर परिणाम

ऑगस्ट महिन्याची पहिली तारीख असून आज अनेक नियमांमध्ये मोठे बदल झाले. गॅस सिलिंडरच्या दर कमी झाले तर अनेक वस्तूच्या किमती देखील बदलल्या आहेत. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. पण दिलासादायक बाब म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होऊनही आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल २५ मे २०२६ रोजी झाला होता. त्यावेळी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर सुमारे ७.५० रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ७.६० रुपयांनी वाढ केली होती. तेव्हापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जर तुम्ही आज तुमच्या गाडीची टाकी भरण्यासाठी घराबाहेर जाणार असाल, तर तुमच्या शहरात आज १ लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर किती ते घ्या जाणून...

आज दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. आज मुंबईत पेट्रोल १११.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९७.८३ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. आज चेन्नईमध्ये पेट्रोल ९ पैशांनी महाग होऊन १०७.८७ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर डिझेलचा दरही ९ पैशांनी वाढून ९९.६५ रुपये प्रति लिटर झाला आहे.आज गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर २२ पैशांनी वाढून १०२.९७ रुपये प्रति लिटर झाला असून डिझेलचा दरही २२ पैशांनी वाढून ९५.६४ रुपये प्रति लिटर झाला आहे.

आज नोएडामध्ये पेट्रोल ७ पैशांनी स्वस्त झाले असून ते १०१.८९ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर डिझेलच्या दरातही ७ पैशांची घट झाली असून ते ९५.३७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. आज बंगळूरमध्ये पेट्रोलचा दर ७५ पैशांनी वाढून १११.६८ रुपये प्रति लिटर झाला आहे तर डिझेल ७६ पैशांनी महाग होऊन ९९.५६ रुपये प्रति लिटर झाले आहे. आज पाटण्यात पेट्रोलच्या दरात १.३० रुपयांनी वाढ होऊन प्रति लिटर११४.६७ वर पोहोचले आहे. तर डिझेलच्या दरातही १.२५ रुपयांची वाढ झाली ते प्रति लिटर १००.६१ रुपये झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com