Amit Shah Angry: 'दादा, वय झालंय तुमचं', TMC च्या ज्येष्ठ खासदार रॉय यांच्यावर अमित शाह का संतापले?

Lok Sabha Winter Session 2023 : 'दादा, वय झालंय तुमचं', TMC च्या ज्येष्ठ खासदार रॉय यांच्यावर अमित शाह का संतापले?
Amit Shah Angry On Saugata Roy
Amit Shah Angry On Saugata RoySaam Tv
Published On

Amit Shah Angry On Saugata Roy:

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत चर्चेदरम्यान टीएमसी खासदार सौगत रॉय यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज संतापले. अमित शाह म्हणाले की, दादा तुमचं वय झालंय.

सौगत रॉय जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत बोलत होते. ते म्हणाले की, भाजप सरकारने कलम 370 काश्मिरींच्या हितासाठी नाही तर आपली निवडणूक आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणि जनसंघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे 'एक निशान, एक प्रधान आणि एक संविधान' हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रद्द केले आहे. यानंतर शाह त्यांच्यावर संतापले. अमित शाह सौगता रॉय यांच्यावर अशाप्रकारे नाराज होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही हिवाळी अधिवेशनातही त्यांनी सौगत रॉय यांच्यावर संताप व्यक्त केला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amit Shah Angry On Saugata Roy
Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते राहणार बंद

आज लोकसभेत बोलताना सौगत रॉय म्हणाले, मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवायचो तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा नारा 'एक निशान, एक प्रधान आणि एक विधान' होता. ही त्यांची घोषणा होती. यावर अमित शाह म्हणाले की, देशात अशी मागणी करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. एका देशाला दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज कसे असू शकतात? ज्याने हे केले त्यांनी चूक केली. नरेंद्र मोदी यांनी त्यात सुधारणा करण्याचे काम केले आहे. तुमच्या संमतीने किंवा गैर-संमतीने काय होते? संपूर्ण देशाला हे हवे होते. ही निवडणूक घोषणा नाही. देशात एकच चिन्ह, एक प्रमुख आणि एक संविधान असावे, असे आपण 1950 पासून म्हणत होतो. (Latest Marathi News)

अमित शाह म्हणाले की, पूर्वी लोक दगडफेक करायचे पण 370 हटवल्यानंतर ते थांबले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांना तुरुंगात डांबले गेले आणि भारताचा झेंडाही फडकवला गेला नव्हता. आता फक्त श्रीनगरच्या लाल चौकातच नाही तर काश्मीरच्या प्रत्येक गल्लीत तिरंगा फडकतो आहे.

Amit Shah Angry On Saugata Roy
Sukhdev Singh Gogamedi: करणी सेनेच्या अध्यक्षांच्या हत्येचा CCTV Video आला समोर, लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली हत्येची जबाबदारी

ते म्हणाले की, रॉय बंगाल उद्ध्वस्त करत आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत मांडले होते. यात पीओकेमधून विस्थापित झालेल्या काश्मिरींसाठी आरक्षणाची तरतूद आहे. याशिवाय एससी, एसटी आणि इतर मागास जातींनाही आरक्षण दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com