Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, हे रस्ते राहणार बंद

Mahaparinirvan Diwas: Mumbai Traffic Update For 6 December 2023 | 6 डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीच्या आजूबाजूला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Mahaparinirvan Din: Mumbai Traffic Update For 6 December 2023
Mahaparinirvan Din: Mumbai Traffic Update For 6 December 2023Mahaparinirvan Diwas 2023: Mumbai Traffic Update Din- Saam Tv
Published On

Mumbai Traffic Changes 6 December 2023:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजेच महापरिनिर्वाण दिवशी 6 डिसेंबर रोजी दादर, मुंबई येथील चैत्यभूमीला हजारो अनुयायी भेट देतील, अशी शक्यता वरावण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून सूचनाही जारी करण्यात आली आहे.

6 डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीच्या आजूबाजूला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. वाहतूक सुरळीत चालावी यासाठी, मंगळवार सकाळी 6 ते बुधवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खालील वाहतूक निर्बंध लागू केले जातील.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahaparinirvan Din: Mumbai Traffic Update For 6 December 2023
Sukhdev Singh Gogamedi: करणी सेनेच्या अध्यक्षांच्या हत्येचा CCTV Video आला समोर, लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली हत्येची जबाबदारी

हे रस्ते राहणार बंद

  • स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा श्री सिद्धीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटल पर्यंत वाहतुकीकरीता बंद राहिल. यातच हिंदूजा हॉस्पिटल येथील स्थानिक नागरिक हे एस. बैंक जंक्शन येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे जावू शकतील.

  • एस. के. बोले रोड उत्तर वाहिनी श्री सिद्धीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग राहिल, म्हणजेच या मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरून पोतृगिज चर्च जंक्शन येथून श्री सिद्धीविनायक मंदिर जंक्शनकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद राहिल. (Latest Marathi News)

  • संपूर्ण रानडे रोड हा सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद राहिल.

  • ज्ञानेश्वर मंदिर रस्ता सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद राहील.

  • संभेकर महाराज रस्ता सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद राहील.

  • केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद राहील.

Mahaparinirvan Din: Mumbai Traffic Update For 6 December 2023
Mumbai Water Issue: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, गुरुवारी 'या' भागात पाणीपुरवठा बंद राहणार

या मार्गांवर अजवड वाहनांना बंदी

  • ए. एस.व्ही. माहीम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन.

  • एल.जे. रोड माहीम जंक्शन ते गडकरी जंक्शन.

  • 3. गोखले रोड - गडकरी जंक्शन ते धनमिल नाका.

  • सेनापताई बापट रोड-माहीम रेल्वे.स्टेशन ते वडाचा नाका

  • टिळक पूल दादर टीटी सर्कल ते वीर कोतवाल उद्यान, एन.सी. केळकर रोड.

Mahaparinirvan Din: Mumbai Traffic Update For 6 December 2023
Relationship Tips | तुमचा पार्टनर Ignore करतोय? या टीप्सने नात्यात आणा पुन्हा गोडवा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com