ukraine attack russia  Saam tv
देश विदेश

Ukraine Attack : युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला; ४० 'बाहुबली फायटर प्लेन' पाडले

ukraine attack russia : युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला केलाय. युक्रेनने रशियाचे ४० 'बाहुबली फायटर प्लेन' पाडले.

Vishal Gangurde

युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाची ठिणगी कायम आहे. रशियाकडून सातत्याने युक्रेनमधील शहरांवर मिसाइल हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्याचं प्रत्युत्तर युक्रेनने रशियाला दिलं आहे. युक्रेनने रशियाचे ४० बाहुबली फायटर प्लेन पाडल्याचा दावा केला आहे. यात हायटेक विमानांचा समावेश आहे.

युक्रेनची सुरक्षा सेवाने १ जून रोजी दावा केला की, 'त्यांनी विशेष ऑपरेशन अंतर्गत रशियाच्या ४० फायटर प्लेनवर हल्ला केला. या हल्ल्यात एकूण ४० प्लेन जळून खाक झाले आहेत. याच विमानांनी युक्रेनमधील काही शहरांवर हल्ला केला होता. त्यानंतर आम्ही हे विमान पाडले'.

युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियात खळबळ

युक्रेनच्या हल्ल्याचं प्रमुख लक्ष्य हे रशियातील इरकुत्सक भाग होता. रशियातील बेलाया एअरबेस युक्रेनच्या सीमेपासून सुमारे ४००० किलोमीटर अंतरावर आहे. युक्रेनने केलेल्या हल्ल्याला इरकुत्स्कचे गव्हर्नर इगोर कोबझेव यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांनी अधिकची माहिती दिलेली नाही. तसेच ओलेन्या एअरबेसमध्येही आग लागल्याचं वृत्त आहे. तेथील गव्हर्नर आंद्रेई चिबिस यांनी ड्रोन हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कोणती विमाने नष्ट झाली?

यूक्रेनच्या सुरक्षा सेवांनी (SBU) सांगितले की, युक्रेनच्या विशेष ऑपरेशनमध्ये रशियाची फायटर विमाने नष्ट झाली. युक्रेनने A-50, Tu-95 आणि Tu-22M3 या विमानांना टार्गेट केलं. रशियाचं A-50 विमान अत्यंत महत्त्वाचे मानलं जातं होतं. कारण या विमानाचा शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टम्स, क्षेपणास्त्रे आणि फायटर जेट्स ओळखण्यासाठी वापर व्हायचा. तसेच लक्ष्य निश्चित करण्यासाठी विमान वापरले जायचे. या विमानाची किंमत सुमारे ३५० मिलियन डॉलर आहे. या विमानांची संख्या रशियाकडे फारच मर्यादित आहे.

बॉम्बफेक करणारे Tu-95 विमान हे अण्वस्त्रे आणि क्रूज क्षेपणास्त्रे नेण्यास सक्षम आहे. तर Tu-22M3 हे सुपरसोनिक बॉम्बफेक करणारे विमान ताशी ४,००० किमी वेगाने उडू शकते. यांसारखी विमाने पाडण्यासाठी अमेरिकाचे 'पॅट्रियट' किंवा युरोपचे 'SAMP-T' सारख्या अॅडव्हान्सड डिफेन्स सिस्टम्स आवश्यक असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT