काँग्रेसची जोरदार मुसंडी, झेडपी-पंचायत समिती निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी भाजपचा पराभव; किती जिल्ह्यांत सत्ता?

Rajasthan Local Body Election Results: राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. 275 पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचा विजय झाला असून भाजपला केवळ 63 ठिकाणी यश मिळाले आहे.
Rajasthan election results 2026
Rajasthan election results 2026saam tv
Published On: 

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच भाजपची सत्ता आहे. देशातील अनेक राज्यांच्या विधानभवनावर भाजपने झेंडा फडकवला आहे. तसेच राजस्थानमध्ये देखील भाजप सत्तेत असून काँग्रेस ही विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेली आहे. मात्र काल झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी भाजपच टेन्शन वाढवलय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांमध्ये काँग्रेसने अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे भाजपला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. जिल्हा परिषदेच्या 37 जागांपैकी काँग्रेसने 23 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने 5 जागा जिंकल्या असून 6 जागांवर आघाडी घेतली आहे. नागौरमध्ये आरएलपीने विजय मिळवला आहे.

Rajasthan election results 2026
बाईक-चारचाकीवर जात लिहिणाऱ्यांची आता खैर नाही; वाहनांबाबत 'या' राज्य सरकारचा मोठा निर्णय

बालोतरा येथे काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 12 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे 7 जागा जिंकणारी आरएलपी येथे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. डुंगरपूरमध्ये काँग्रेस आणि बीएपीला प्रत्येकी 14 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने 9 जागा जिंकल्या आहेत. खैरथल-तिजारा येथेही काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 10 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे येथे अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Rajasthan election results 2026
नोटांचे बंडल, विदेशी चलन अन् सोन्याच्या विटा; CBIनं CGST अधीक्षकाच्या घरात टाकलेल्या धाडीत काय-काय सापडलं?

275 पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचा विजय

पंचायत समितीच्या सर्व 419 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये काँग्रेसने 275 पंचायत समित्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर भाजपला 63 ठिकाणी यश मिळाले आहे. आरएलपी, बीएपी आणि सीपीएम या छोट्या पक्षांनी मिळून 64 जागा जिंकल्या आहेत. तर 17 पंचायत समित्यांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. जिल्हा परिषदेच्या एकूण 1,275 वॉर्डांपैकी काँग्रेसने 794 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 357 जागांवर विजय मिळाला आहे. तसेच आरएलपीने 51, बीएपीने 43, बसपने 6, सीपीएमने 7 आणि अपक्ष उमेदवारांनी 13 जागांवर विजय मिळवला आहे.

Rajasthan election results 2026
दिग्गज नेत्याचा भाजपला रामराम; विरोधी पक्षात केला प्रवेश, राजकारणात खळबळ

पंचायत समितीच्या एकूण 7,543 जागांपैकी काँग्रेसने 3,758 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 2,213 जागांवर विजय मिळाला आहे. आरएलपीने 497, बीएपीने 278, बसपने 60 आणि सीपीएमने 50 जागा जिंकल्या आहेत. तर अपक्ष उमेदवारांनी 662 जागांवर विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.