दिग्गज नेत्याचा भाजपला रामराम; विरोधी पक्षात केला प्रवेश, राजकारणात खळबळ

BJP leader Utpal Rai Joins Samajwadi Party: उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड! भाजप नेते उत्पल राय यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षांतरामुळे गाझीपूर आणि मऊमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
BJP Leader Utpal Rai Quits Party
BJP Leader Utpal Rai Quits Partysaam tv
Published On: 

पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. समाजवादीचे पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली असून अनेक दिग्गज नेते गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच भाजपचे नेते उत्पल राय यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. उत्पल राय हे बसपा सरकारच्या काळात राज्यमंत्री होते. तयांच्या पक्षप्रवेशामुळे गाझीपूर आणि मऊमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BJP Leader Utpal Rai Quits Party
Good News: दिलासादायक! आता कोणत्याही वयात व्हा वकील, वयोमर्यादेची अट रद्द

उत्पल राय हे केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी जुलै 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच ते अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्षही राहिले आहेत. उत्पल राय हे मऊ जिल्ह्यातील रहिवासी असून, मधुबन विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आहे. डॉ. शकुंतला मिश्रा पुनर्वसन विद्यापीठाचे माजी कुलगुरू निशीथ राय यांचे ते धाकटे बंधू आहेत.

BJP Leader Utpal Rai Quits Party
Accident: भरधाव बसची दुचाकीला धडक, एका कुटुंबातील चौघांसह ५ जणांचा मृत्यू

अखिलेश यादव यांचा भाजपला टोला

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्पल राय यांचे पक्षात स्वागत करत भाजपवर निशाणा साधला. उत्पल राय यांनी कमळ सोडून समाजवादी पक्षाची साथ दिल्याचा टोला अखिलेश यादव यांनी लगावला. यावेळी अखिलेश यादव यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारवर टीका केली. जनता भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढणार असल्याचा दावा त्यांनी केला.

BJP Leader Utpal Rai Quits Party
मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयात भाजपचा दारुण पराभव! काँग्रेसचा 21 जागांवर दणदणीत विजय; वारं फिरलं?

अखिलेश यादव म्हणाले, आमच्याकडे निरोप देताना राधे-राधे म्हटलं जातं. यावेळी जनता या सरकारला निरोप देणार आहे. त्यामुळे ही राधे-राधे म्हणत निरोप देण्याची वेळ आहे. उत्पल राय यांनी 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली होती. आता त्यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशातील गाझीपूर आणि मऊच्या राजकारणात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.