

वकिलीचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता कोणत्याही वयात तुम्हाला वकील होता येणार आहे. भारतीय बार कौन्सिलने टाकलेली वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे. भारतीय बार कौन्सिलने ३ आणि ५ वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमांची वयोमर्यादा मागे घेतली आहे. त्यामुळे आता तुमचे वयाच्या कुठल्याही वर्षी वकील होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
अनेकदा नोकरी करत असताना किंवा निवृत्त झाल्यानंतर अनेकांना वकील होण्याची इच्छा असते. पण भारतीय बार कौन्सिलने वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी वयोमर्यादा निश्चित केली होती. पण आता वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचारी, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींना कायद्याचे शिक्षण घेता येणार आहे.
५ नोव्हेंबरला झालेल्या भारतीय बार कौन्सिलच्या सर्वसाधारण परिषदेत वयोमर्यादा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ६ नोव्हेंबरला याची माहिती सुप्रीम कोर्टात सांगण्यात आली. नोकरी करून अनेकांना कायद्याचे शिक्षण घ्यावे लागत होते पण ते पूर्ण करता येत नव्हते, कौटुंबीक अडचणींमुळे अनेकांना वकिलीचे शिक्षण घेता आले नव्हते, निवृत्तीनंतर काहींनी वकिलीचे शिक्षण पूर्ण करण्याचा विचार केला होता या सर्वाचे वकील होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या निर्मयानंतर आता, विद्यार्थ्यांना बारावीनंतर ५ वर्षांचा एलएलबीचा अभ्यासक्रम आणि पदवीनंतर ३ वर्षांचा एलएलबीचा अभ्यासक्रम करता येतो. या दोन्ही अभ्यासक्रमांना कमाल मर्यादा नसणार आहे. यापूर्वी ५ वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना २० वर्षे, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी २२ वर्षे वयोमर्यादा होती. त्यासोबत ३ वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी देखील वयोमर्यादा होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.