Mumbai Advocate Beaten By Police: पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेले आणि पोलिसांनी केली बेदम मारहाण, महिला वकील जखमी; नेमकं काय घडलं?

Antop Hill Police Station : या प्रकरणाने एकच खळबळ उडाली असून वकील संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
Antop Hill Police Station
Antop Hill Police StationSaam Tv
Published On

जयश्री मोरे, मुंबई

Mumbai Police: मुंबईमध्ये दोन वकिलांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने (senior police inspector) बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतल्या अँटॉप हिल (Antop Hill) परिसरात ही घटना घडली आहे. या वकिलामध्ये एका महिला वकिलाचा समावेश आहे. जखमी झालेल्या महिला वकिलावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली असून वकील संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Antop Hill Police Station
Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, लोणावळ्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या अँटॉप हिल येथील दोस्ती शॉपी लिंकमधील एका वादाबाबत तक्रार करण्यासाठी वकिल हरिकेश शर्मा आणि वकिल साधना यादव हे पोलीस ठाण्यात गेले होते. दोन्ही वकिलांना गुरुवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासिर कुलकर्णी यांनी अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली, असा आरोप या दोन्ही वकिलांनी केला आहे.

साधना यादव तक्रार मांडत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासिर कुलकर्णी यांनी त्यांना आवाज खाली करा असा दबाव टाकला. त्यानंतर इथे आपल्याला न्याय मिळणार नाही असं म्हणत दोघेही वकील पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असतानाच कुलकर्णी यांनी पोलिसांना त्यांना परत आणण्याचे आदेश दिले. त्यानंतर या दोन वकिलांना पोलीस ठाण्याच्या वरच्या मजल्यावर नेऊन मारहाण करण्यात आली.

Antop Hill Police Station
Sameer Wankhede: IRS समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? CBIच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

या दोन्ही वकिलांना वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये नेऊन मारहाण केली. त्यानंतर दोघांना दहशतीखाली सायन रुग्णालयात नेऊन वेगळी कारणे दाखवत उपचार करून पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच दोघांना मध्यरात्रीपर्यंत डांबून ठेवत पुन्हा त्यांना पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली, असा आरोप या वकिलांनी केला आहे. या अमानुष मारहाणीमुळे वकील साधना यांच्या पायाला आणि कानाला गंभीर दुखापत झाल्याने सध्या त्या सायन रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या प्रकाराचा अनेक वकील संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबद्दल लेखी तक्रार देण्याची तयारी आता वकील संघटनांनी केली आहे. पोलिसांकडून वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांची सरकारने गंभीर दखल घ्यावी. तसेच त्यांच्यावर अशाप्रकारे हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे ऑल इंडिया फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी प्रकाश जाधव यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com