Sameer Wankhede
Sameer Wankhede Saam Tv

Sameer Wankhede: IRS समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? CBIच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Sameer Wankhede: समीर वानखेडे यांची अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai News: आर्यन खानच्या प्रकरणामध्ये (Aryan Khan Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची आज सीबीआयने ३ तास चौकशी केली. समीर वानखेडे यांची आता दुसऱ्या सत्रात पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वानखेडे यांची अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

कोर्टाने समीर वानखेडे यांना २४ मेपर्यंत अटक न करण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांना २४ मे पर्यंत कोर्टाचे संरक्षण मिळणार आहे.

कोर्टाच्या या निर्णयामुळे समीर वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे. याचदरम्यान, आज सीबीआयने दुसरे समन्स बजावल्यानंतर वानखडे चौकशीसाठी हजर झाले होते. ३ तासाच्या चौकशीनंतर समीर वानखडे सीबीआय कार्यालयातून बाहेर पडले.

Sameer Wankhede
Devendra Fadnavis Reaction: नोटबंदीच्या निर्णयाबाबत फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, "कुणी काळा पैसा..."

चौकशीत नेमकं काय घडलं?

आर्यन खान खंडणी प्रकरणी समीर वानखडे यांना चौकशीसाठी आज बोलावण्यात आले होते. समीर वानखेडे दुसऱ्या सत्रात पुन्हा चौकशीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत तीन तास चौकशी झाली आहे. वानखडेंची ८ सीबीआय अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे.

तपास अधिकाऱ्यांनी मागवलेली कागदपत्रे समीर वानखडेंनी सीबीआय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहेत. कागदपत्रांची पाहणी करून समीर वानखडेंकडे चौकशी केली जात आहे. काही अनैपचारिक तर काही प्रश्न गुन्ह्यांशी संबधित प्रश्न विचारले गेल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

समीर वानखेडे यांनी गोव्याला जाणाऱ्या कोर्डीलिया क्रूझवर छापा टाकत अमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. याप्रकरणी आर्यन खानला तुरुंगात जावे लागले होते.

आता हे प्रकरण तब्बल 19 महिन्यांनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. समीर वानखेडे आणि इतर काही जणांनी मिळून आर्यन खानकडे 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे.

Sameer Wankhede
Ajit Pawar News : ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, हे विसरू नका! अजित पवारांनी काेणाला दिला दम (पाहा व्हिडिओ)

आता भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. सीबीआयने वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्या गोरेगाव येथील घरावर छापा देखील टाकला होता. तसंच सीबीआयने समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे मोबाईल जप्त केले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com