कापसाच्या पिकात गांजाची शेती! नंदुरबारमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar illegal ganja smuggling : नंदुरबारमध्ये अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १५ लाखांचा गांजा आणि मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक मोहिमेत पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
Major police operation against cannabis trafficking in Nandurbar
Major police operation against cannabis trafficking in Nandurbar saam tv
Published On: 

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात नंदुरबार पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अक्कलकुवा आणि नवापूर तालुक्यात दोन स्वतंत्र कारवाया करत तब्बल १५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत कापसाच्या शेतात गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, दुचाकीवरून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कापसाच्या पिकात गांजाची लागवड

पहिली कारवाई अक्कलकुवा तालुक्यातील जामली येथे करण्यात आली. या ठिकाणी सांगा नाईक याने कापसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित शेतावर छापा टाकला. या कारवाईत १२ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीची २७ किलो ९१० ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी सांगा नाईक याला अटक करण्यात आली आहे.

Major police operation against cannabis trafficking in Nandurbar
Central Railway : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्यरात्री विशेष ब्लॉक; लोकलच्या वेळापत्रकात बदल, एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम

दुचाकीवरून गांजाची तस्करी

दुसरी कारवाई नवापूर-पिंपळनेर मार्गावर करण्यात आली. या मार्गावर दुचाकीवरून सुक्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सचिन बागुल, बंटी कोकणी आणि दिनेश भोये या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ किलो १५१ ग्रॅम सुका गांजा आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख २७ हजार ५०० रुपये आहे.

Major police operation against cannabis trafficking in Nandurbar
Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात मोठी पदोन्नती, २ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना महासंचालकपदी बढती

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संबंधित आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आगामी सणांच्या काळात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे अवैध गांजा लागवड आणि तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.