Fake Currency : तुमच्या खिशातील 500 ची नोट बनावट? RBIच्या अहवालात काय? वाचा सविस्तर

Fake Currency report : तुमच्या खिशातील पाचशेची नोट बनावट तर नाही ना एकदा चेक करा... कारण बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय... मात्र बनावट नोटा कशा ओळखायच्या? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Fake Currency RBI report
Fake Currency report Saam tv
Published On

तुम्ही पै-पै कमावण्यासाठी झगडता... काबाडकष्ट करता.. मात्र काबाडकष्ट करुन कमावलेली तुमच्या खिशातली 200 आणि पाचशेची नोट नकली तर नाही ना? हे एकदा चेक करा... कारण 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत तब्बल 37 टक्क्यांची वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तवच रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आलंय....

Fake Currency RBI report
Shocking : नवरीने लग्नाच्या रात्री बॉयफ्रेंडला बोलावलं; बेडरुममधील नजारा पाहून नवऱ्याला बसला जबरदस्त धक्का

500 च्या नकली नोटात वाढ

2023-24 मध्ये 85 हजार 711 नकली नोटा पकडल्या

2024-25 मध्ये 1 लाख 17 हजार 722 नकली नोटा

नकली नोटांच्या संख्येत 37.35 टक्के वाढ

200 च्या नकली नोटा

2024-2025 मध्ये 32 हजार 600 नकली नोटा आढळून आल्या

Fake Currency RBI report
Corona Update : हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने वसईतील तरुणाचा बळी घेतला, परिसरात हळहळ

बनावट नोट म्हणजे फेक इंडियन करन्सी नोट म्हणजे एफआयसीएन. कायद्यानुसार बनावट नोट बाळगणं आणि तिचा प्रसार करणं गुन्हा आहे.. त्यामुळे बनावट नोटा निर्मिती करणारे कारखाने आणि टोळ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी नोटबंदी करण्यात आली.. मात्र नोटबंदीनंतरही बाजारात बनावट नोटा येत असल्याचं समोर आलंय.. मात्र या बनावट नोटा कशा ओळखाव्यात? पाहूयात...

Fake Currency RBI report
Post Office Scheme : पैसा वसूल योजना! दिवसाला फक्त ५० रुपये खर्च करा अन् मिळवा ३५ लाखांचा परतावा, वाचा सविस्तर

500 च्या नोटेवर लाल किल्ल्याचं तर 200 च्या नोटेवर सांची स्तूपचं चित्र

नोट प्रकाशात धरल्यावर महात्मा गांधींचे चित्रं आणि रक्कम स्पष्ट दिसते

नोट हलवल्यास सुरक्षा धागा एकसंध दिसतो

नोटेवर भारत आणि RBI अशी अक्षरं दिसतात

खऱ्या नोटेवरची अक्षरांची छपाई वर आल्यानं बोटांना जाणवते

खऱ्या नोटेवर रिझर्व्ह बँकेकडून नोटेचा नंबर नमूद

बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट असल्यानं प्रत्येक नोट तपासून घेणं हाच फसवणूक टाळण्याचा एकमेव उपाय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com