Shocking : नवरीने लग्नाच्या रात्री बॉयफ्रेंडला बोलावलं; बेडरुममधील नजारा पाहून नवऱ्याला बसला जबरदस्त धक्का

husband and wife clash : नवरीने लग्नाच्या रात्री बॉयफ्रेंडला बोलावल्यानंतर त्याच्यासोबत फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना नवऱ्याला कळाल्यानंतर त्याची झोपच उडाली.
Uttar pradesh Shocking
shocking Saam tv
Published On

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. तरुण असो किंवा तरुणी प्रत्येक जण लग्नाच्या रात्रीची उत्सुकतेने वाट पाहत असतात. मात्र, काही वेळा हाच क्षण प्रचंड मोठा धक्का देणारा ठरतो. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Uttar pradesh Shocking
Beed Shocking : चाललंय काय? मंदिरातच तरुणाला बेदम मारहाण, बीडमधील आणखी एक धक्कदायक प्रकार, VIDEO

एका तरुणाने विवाह करून पत्नीला घरी आणलं. पण, त्या नववधूच्या मनात काही वेगळाच विचार सुरू होता. लग्नाच्या पहिल्याच रात्रीच तिने तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलावलं. नवरा जेव्हा बेडरूममध्ये गेला. त्यानंतर बेडरूममधील दृश्य पाहून त्याचा थरकाप उडाला. या घटनेनंतर नवऱ्याने आरडाओरड केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणामुळे नवऱ्याच्या कुटुंबीयांमध्येही प्रचंड संताप आणि धक्का बसलाय.

Uttar pradesh Shocking
Nigeria Flood : पुराचा हाहाकार, धरण फुटलं, ११७ जणांचा मृत्यू, बघा धक्कादायक VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीचं २७ मे रोजी लग्न झालं. लग्नानंतर तरुणी सासरी पोहोचली. तरुणी सासरी आल्यानंतर नवरा लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी उत्सुक होता. मात्र, त्याचदिवशी नववधूच्या डोक्यात काही वेगळंच सुरु होतं. नवरा मोठ्या उत्साहाने बेडरुममध्ये गेला. त्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. त्याची बायको घरातून बेपत्ता होती. त्याने घरात सर्वत्र शोधलं, पण सापडली नाही. तिचा शोध घेतल्यानंतर कळाले की, त्याची बायको बॉयफ्रेंडसोबत बाईकवर बसून फरार झाली. या संपूर्ण प्रकारानंतर ही माहिती नवऱ्याच्या कुटुंबीयांनी तरुणीच्या घरी दिली. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये मोठा राडा झाला.

Uttar pradesh Shocking
Mumbai Shocking : मुंबईत २१ मजली इमारतीची कार लिफ्ट कोसळली; एकाचा जागीच मृत्यू

दोन्ही कुटुंबीयांमध्ये जबरस्त राडा झाल्यानंतर बॉयफ्रेंडने तिला माहेरी सोडलं. मात्र, नवरी बॉयफ्रेंडसोबतच राहण्यावर अडून बसली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिची समजूत काढली. मात्र, काही नवरी ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर गावात पंचायत बसली.

या बैठकीत गावातील तीन प्रमुखांनी हजेरी लावली. या बैठकीत एक प्रस्ताव ठेवला की, बॉयफ्रेंडने लग्नाचा तीन लाखांचा खर्च भरून द्यावा. त्यानंतर तरुणीला सोबत घेऊन जावे. मात्र, त्याने भरपाई देण्यास नकार दिला. इतकी रक्कम देण्यास सक्षम नसल्याचे बॉयफ्रेंडने बैठकीत सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com