Nigeria Flood : पुराचा हाहाकार, धरण फुटलं, ११७ जणांचा मृत्यू, बघा धक्कादायक VIDEO

Nigeria Flood update : नायजेरियात पुराने हाहाकार माजवलाय. त्यात धरण फुटल्याने ११७ जणांचा मृत्यू झाला आहे.
Nigeria Flood update
Nigeria Flood Saam tv
Published On

Nigeria Flood  : नायजेरियामध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. या पुरामुळे लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे. पुरामुळे शहरात चोहीकडे पाणीच पाणी झालं आहे. पुराच्या हाहाकारात आतापर्यंत ११७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Nigeria Flood update
Nilesh Ghare Arrest : शस्त्र परवान्यासाठी नको त्या थराला गेला; पोलिसांनी निलेश घारेच्या मुसक्या आवळल्या

मीडिया रिपोर्टनुसार, सेंट्रल नायजेरियाच्या नायजर राज्यामध्ये पुराचा कहर पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसानंतर पुराने कहर केला आहे. त्यात धरण फुटल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. या पुरात ११७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Nigeria Flood update
Mumbai Police : मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; १३ बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

नायजेरियाचे हुसैनी ईसा यांनी सांगितलं की, अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ११७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत ८८ जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या पुरात अनेक जण बेपत्ता झाले आहेत. पुरामुळे नायजरमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

नायजेरियाला तीन वर्षांपूर्वी अशाच भयंकर पुराचा सामना करावा लागला होता. नायजेरियात दरवर्षीत मुसळधार पावसामुळे नद्या दुधडी भरून वाहतात. यामुळे आजूबाजूच्या गावांना धोका निर्माण होतो.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी झालेल्या पुरामुळे ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. लाखो लोकांना या पुराचा फटका बसला होता. अनेक देशांनी पुराचा इशारा दिल्यानंतरही नायजेरिया देशाने कोणतीही पूर्वतयारी केली नव्हती. मागील दशकात नायजेरियाला पुरामुळे १३ लाखांहून अधिक जणांना फटका बसला आहे. साधारण नायजेरियाला दरवर्षीच पुराचा फटका बसत असल्याचे दिसत आहे.

Nigeria Flood update
Ladki Bahin Yojana : गलेलठ्ठ पगार, तरीही १५०० रुपयांचा मोह; तपासणीत पोलखोल, सरकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? VIDEO

नायजेरियातील पुरामागे मुसळधार पाऊस आणि हवामान बदलाचंही कारण असल्याचं म्हटलं जात आहे. तीन वर्षांपूर्वी वर्षी ढिसाळ नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे नुकसान वाढलं होतं. शेतीचंही मोठे नुकसान झालं होतं. नायजेरियात तीन वर्षापूर्वीच्या पुरामुळे ३६ पैकी २७ राज्यांना पुराचा फटका बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com