Post Office Scheme : पैसा वसूल योजना! दिवसाला फक्त ५० रुपये खर्च करा अन् मिळवा ३५ लाखांचा परतावा, वाचा सविस्तर

Post Office Scheme in Marathi : तुम्ही दिवसाला फक्त ५० रुपये खर्च रुपये खर्च केल्यास ३५ लाखांचा परतावा मिळेल. वाचा संपूर्ण योजना
Post Office
Post Office Scheme in MarathiSaam tv
Published On

Post Office Scheme : भारतीय पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना लोकप्रिय आहेत. यामध्ये गुंतवणुकीचा धोका अत्यल्प असतो. देशातील लाखो लोक पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून निश्चित परतावा घेत आहेत. नागरिकांसाठी पोस्टाने आता ग्राम सुरक्षा योजना सुरू केली आहे. ही योजना अतिशय फायदेशीर मानली जात आहे.

दिवसाला फक्त ₹50 खर्च करा आणि मिळवा ₹35 लाखांचा परतावा!

या योजनेत दररोज फक्त ₹50 गुंतवले तर मुदत अवधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारास सुमारे 35 लाखांचा परतावा मिळतो. या योजनेचा मुदत (maturity) कालावधी पूर्ण झाला. तर वयाच्या 80 व्या वर्षी ही रक्कम गुंतवणूकदाराला मिळते. जर गुंतवणूकदाराचा मृत्यू याआधी झाला. तर नोंदणीकृत वारसास ही रक्कम दिली जाते.

योजनेची पात्रता आणि हप्ता काय?

या योजनेत 19 ते 55 वर्षांतील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. हप्ता आपण मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक स्वरूपात भरू शकतो. उदाहरणार्थ, जर आपण मासिक ₹1,515 हप्ता भरत असाल, तर ही गुंतवणूक 80 वर्षांपर्यंत चालते.

Post Office
Nigeria Flood : पुराचा हाहाकार, धरण फुटलं, ११७ जणांचा मृत्यू, बघा धक्कादायक VIDEO

बोनस आणि इतर फायदे काय?

या योजनेत पाच वर्षांनंतर बोनस मिळतो. चार वर्षांनंतर कर्जाची सुविधा देखील उपलब्ध होते. तुम्हाला पॉलिसी रद्द (सरेंडर) करायची असेल, तर ती किमान तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर शक्य होते.

परतावा किती मिळतो?

तुम्ही सुमारे 55 वर्षे योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 31.60 लाख रुपये मिळतील. 58 वर्षे गुंतवणूक केल्यास 33.40 लाख रुपये मिळतील. 60 वर्षे गुंतवणूक केल्यास 34.60 लाख रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com