Kalyan News : कल्याणमध्ये रिक्षाचालकांची तुंबळ हाणामारी; एक रक्तबंबाळ, दुसऱ्याला फिट आली, बघा धक्कादायक व्हिडिओ

Kalyan rickshaw driver fight : कल्याणमध्ये रिक्षाचालकांची तुंबळ हाणामारी झाली आहे. या रिक्षाचालकांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
kalyan
kalyan News Saam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याणमधून मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कल्याणमध्ये रिक्षा चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली आहे. दोन्ही रिक्षा चालकांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत एक रिक्षाचालक जखमी झाला आहे. तर दुसऱ्याला थेट फिटच आली. या दोघांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

kalyan
Mumbai Police : मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; १३ बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

कल्याणमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी कायम बघायला मिळते. कल्याणमधील काही रिक्षाचालक प्रवाशांवर दादागिरी करताना दिसतात. मागील वर्षभरात रिक्षा चालकांनी प्रवाशांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मारहाणीच्या अनेक तक्रारी पोलिसांत नोंद आहेत. कल्याणमधील याच रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

kalyan
Corona Update : हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने वसईतील तरुणाचा बळी घेतला, परिसरात हळहळ

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षाचालकांमध्ये राडा झाला. दोन रिक्षाचालक एकमेकांना भिडले. दोन्ही रिक्षाचालकांमधील वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीमध्ये झालं. एका रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी दुसऱ्या रिक्षाचालकाला मारहाण केली. या मारहाणीत रिक्षाचालक जखमी झाला. या हाणामारीवेळी एकाला फिट आली.

kalyan
Pune Accident : पुण्यात भरधाव कारने १२ जणांना उडवलं; अपघातातील जखमींची यादी आली समोर,वाचा

फिट आल्यानंतर हा तरुण थेट रस्त्यावर कोसळला. त्यानंतर त्याच्या मदतीला काही लोक धावले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, रिक्षाचालकांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या बेशिस्तीच्या आणखी एक प्रकार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com