Kalyan News : कल्याणमध्ये शाळेची भिंत खेळणाऱ्या मुलांवर पडली; एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Kalyan school building wall collapse : कल्याणमध्ये एका शाळेची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाच जागीच मृत्यू झाला आहे.
kalyan News
Kalyan school building wall collapse Sam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

Kalyan News : कल्याणमध्ये सप्तश्रृंगी इमारतीचा काही भाग कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका शाळेची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत शुक्रवारी कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ११ वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.

kalyan News
Vaishnavi Hagawane : बायकोला ४ कानाखाली मारणे म्हणजे छळ नव्हे; कोर्टात सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर

कल्याणजवळील बल्यानी परिसरात शाळेची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. कल्याची केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत अचानक कोसळल्याची घटना घडली. शाळेची भिंत कोसळून काही विद्यार्थी जखमी असल्याची माहिती मिळाली. काही जण गंभीर जखमी झाले.

kalyan News
Bhaucha Dhakka : भूमिपूत्रांवर बांग्लादेशींची भाईगिरी; भाऊच्या धक्क्यावर कोळी बांधवांनाच धक्का, VIDEO

शाळेची भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांमध्ये भीती पसरली. शाळेची भिंत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस अग्निशामक दल आणि पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याणच्या बल्यानी केबीके इंटरनॅशनल स्कूल शाळेची भिंत कोसळून एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

kalyan News
Husband Wife Quarrel : नवऱ्यावर बायको रुसली; थेट रस्त्यावर जाऊन बसली, पुण्यातील घटना, VIDEO

नेमकं काय घडलं?

कल्याणच्या बल्यानी परिसरात असलेल्या केबीके इंटरनॅशनल स्कूलजवळ काही लहान मुले खेळत होती. खेळत असताना एक भिंत अचानक या मुलांवर कोसळली. या घटनेत काही मुले जखमी झाली. तर काही गंभीर जखमी झाली. घटना घडल्यानंतर स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमखींना रुग्णालयात दाखल केले. या संपूर्ण दुर्घनटेत ११ वर्षीय अंशचा मृत्यू झाला. अंशच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com