Russia Attack: युक्रेनमध्ये मृत्यूतांडव; रशियाकडून पुन्हा मिसाईल हल्ला 25 जणांचा मृत्यू

Russia Attack: रशियन सैन्याच्या हल्ल्यात ८ बहुमजली इमारती जमीनदोस्त झाल्यात. आणि सुमारे ३० वाहने उद्ध्वस्त झाली. या हल्ल्याबाबत युक्रेनियन मंत्रालयाकडून एक निवेदनात माहिती देण्यात आलीय.
Russia Attack On Ukraine
Russia Attack
Published On

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबताना दिसत नाहीये. रशियाने युक्रेनवर पुन्हा एकदा मिसाईल हल्ला करण्यात आलाय. शांतता करारांवर सामान्य चर्चा सुरू असतानाच रशियाकडून हल्ला करण्यात आलाय. रशियाने रात्रीच्या वेळी उत्तरेकडील युक्रेनियन शहर डोब्रोपिलियावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केलाय.

डोनेस्तक प्रदेशात झालेल्या एका हल्ल्यात किमान ११ जणांचा मृत्यू झालाय. ४० जण जखमी झाले, मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे. रशियाच्या हल्ल्यात २५ जणांचा मृत्यू झाला असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय. खार्किव आणि ओडेसासह इतर प्रदेशांमध्ये घरे आणि पायाभूत सुविधांना फटका बसला. अमेरिकेने कीवसोबत लष्करी मदत आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण थांबवल्यानंतर रशियन हल्ले तीव्र झालेत. गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या वादानंतर हा हल्ला झाल्याने दहशतीचं वातावरण आहे.

Russia Attack On Ukraine
Zelensky-Trump clash: "मी माफी मागणार नाही...," ट्रम्प- झेलेन्स्की यांच्यात जोरदार खडाजंगी, व्हाइट हाऊसमध्ये नेमकं काय घडलं?

रशियन हल्ल्यांनंतर पोलिश पंतप्रधान डोनाल्ड टस्क म्हणाले, जेव्हा कोणी बर्बर लोकांना शांत करतो तेव्हा असेच घडतं." अधिक बॉम्ब, अधिक आक्रमकता, अधिक बळी," असे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. शुक्रवारी रात्री उशिरा डोनेस्तक प्रदेशातील डोब्रोपिल्या शहरात सर्वात घातक हल्ले झाले. आठ निवासी इमारती आणि एका शॉपिंग सेंटरवर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला यात ११ जण ठार झालेत. रशियाने आपत्कालीन सेवा पोहोचली होती त्यांनाच जाणूनबुजून बचावकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले, असं झेलेन्स्की यांनी टेलिग्राम पोस्टमध्ये म्हटलं.

शनिवारी पहाटे खार्किव प्रदेशातील बोहोदुखिव येथे एका कंपनीवर ड्रोन हल्ला झाला. यात ३ जण ठार आणि ७ जण जखमी झाले, असे प्रादेशिक प्रमुख ओलेह सिन्येहुबोव्ह यांनी वृत्त दिले. तर शुक्रवारी ओडेसा येथील नागरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर आणखी एक ड्रोन हल्ला झाला. "तीन आठवड्यांत प्रदेशातील ऊर्जा प्रणालीवर हा सातवा हल्ला झाल्याचं डीटीईके ऊर्जा कंपनीने म्हटलंय. दरम्यान युक्रेनने रशियाला लक्ष्य करणे सुरूच ठेवलंय. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की त्यांच्या सैन्याने रात्रीतून ३१ युक्रेनियन ड्रोन रोखले आहेत.

रशियन सैन्याच्या हल्ल्यात ८ बहुमजली इमारती जमीनदोस्त झाल्यात. आणि सुमारे ३० वाहने उद्ध्वस्त झाली. या हल्ल्याबाबत युक्रेनियन मंत्रालयाकडून एक निवेदनात माहिती देण्यात आलीय. ज्यामध्ये खार्किव प्रदेशातील हल्ल्यात ३ जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटलंय. रशिया आपल्या लष्करी कारवाया तीव्र करत असल्याने परिस्थिती तणावपूर्ण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com