Zelensky-Trump clash: "मी माफी मागणार नाही...," ट्रम्प- झेलेन्स्की यांच्यात जोरदार खडाजंगी, व्हाइट हाऊसमध्ये नेमकं काय घडलं?

Trump Zelensky Meeting: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना युद्ध चुकीच्या दिशेने जात असल्याचे सांगितले.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात खडाजंगीGoogle
Published On

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये जोरदार खडाजंगी झाली. ट्रम्प यांनी झेलेन्स्कीवर तीव्र शब्दांत टीका केली. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना तडजोड करण्याचा सल्ला देत सांगितले की युक्रेन रशियाविरोधात युद्ध जिंकू शकत नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना युद्ध चुकीच्या दिशेने जात असल्याचे सांगितले. दरम्यान युक्रेनने रशियासोबत युद्धविराम घोषीत करण्याची तडजोड केली पाहिजे असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले. पण झेलेन्स्की यांनी आक्रमक पवित्रा घेत युद्धविरामाच्या प्रस्तावाचा तीव्र शब्दात विरोध करत तो फेटाळून लावला. तसेच रशियासोबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
Donald Trump : अमेरिकेतल्या १८ हजार भारतीयांवर घरवापसीची टांगती तलवार | VIDEO

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जेलेंस्की यांना थेट टीव्ही कॅमेऱ्यांसमोर ओरडून सांगितले की, "तुम्ही युद्ध हरत आहात. तुमच्या हातात काहीही उरलं नाहीये." तसंच, त्यांनी आरोप केला की 'युक्रेन अमेरिकेचा अनादर करत आहे आणि तिसऱ्या विश्वयुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे.' ट्रम्प यांनी जेलेंस्की यांना इशारा दिला की, "अशा प्रकारे खेळण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. उलट, तुम्ही आमचे आभार मानले पाहिजेत."

डोनाल्ड ट्रम्प यांनी वोलोडिमिर जेलेंस्की यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, "तुम्ही रशियाशी तडजोड करा किंवा आम्ही युक्रेनमधून बाहेर पडू." यावेळी ट्रम्प यांच्या शेजारी बसलेले अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी देखील जेलेंस्कीवर शाब्दिक हल्ला चढवला. वेंस यांनी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकन मीडियासमोर ट्रम्प यांच्याशी तर्क-वितर्क करणे अपमानास्पद असल्याचे सांगितले आणि जेलेंस्कीला विचारले, "तुम्ही कधी आभार मानले आहेत का?" यावर जेलेंस्कींनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना रोखण्यात आले. ट्रम्प यांनी युक्रेनला रशियाशी तडजोड करून युद्ध समाप्त करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितल्यानंतर, हा शाब्दिक वाद सुरू झाला.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
Donald Trump Oath Ceremony: अमेरिकेत पुन्हा एकदा 'ट्रम्प पर्व'; 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

या खडाजंगीनंतर वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी माफी मागमयास नकार देत फॉक्स न्युजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "आम्ही काही वाईट केले नाही याची मला खात्री आहे."

Edited By - Purva Plande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com