वर्षभराची मेहनत मातीमोल! कधी काळी बागायती शेती, आता उजाड माळरान; दुष्काळाने सांगवी गावाची दैना

Drought Hits Sugarcane Farmers in Maharashtra : सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सांगवी गावात भीषण पाणीटंचाईमुळे ऊस पिके वाळून गेली आहेत. वर्षभराची मेहनत आणि खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

दुष्काळामुळे गावांमध्ये भीषण स्थिती निर्माण झालीय. नद्या कोरड्या पडल्या आहेत. विहिरींनी तळ गाठलाय. शेतातील पिकं जळून खाक झाली आहेत. कधी काळी बागायती असलेले शेतमळे आज वाळून गेली आहेत. वर्षभराचं कष्ट आणि खर्च वाया गेलंय. उत्पन्न सोडा साधा खर्चही मिळणार नाहीये. गावातील दुष्काळाची स्थिती सांगताना हाताश झालेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात झपकन पाणी येतं. सोलापूरच्या अक्कलकोटमधील सांगवी गावात पाण्याच्या भीषण तुटवड्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

पोटच्या पोराप्रमाणे जपलेला ऊस डोळ्यांसमोर वाळून जात असल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. वर्षभराचं कष्ट आणि खर्च वाया गेल्यानं उत्पन्नाची कोणतीही शाश्वती उरलेली नाही. सांगवी गावातील शेतकऱ्यांची नेमकी काय अवस्था झालीय हे जाणून घेतलंय सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी.

सोलापुरातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट जाणून घेऊ.

गावात पंधरा-पंधरा, वीस-वीस दिवस पाणी येत नाही. आलं तरी अगदी एक दोन हंडी भरतील येतील इतकं पाणी घराच्या दारापुढील नळांना येतं. सांगवी गावात पाण्याच्या भीषण तुटवड्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. आता बागायती एक टक्काही राहणार नाही. शेतातील ऊस वाळून गेलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.