K PonMudy Saam Tv
देश विदेश

K PonMudy : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तामिळनाडूतील मंत्र्याला ३ वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा

Tamil Nadu Minister K PonMudy : मद्रास उच्च न्यायालयाने द्रमुक नेते आणि तमिळनाडूचे मंत्री के पोनीमुडी आणि त्यांची पत्नी यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने पोनमुडी यांना तीन वर्षींचा तुरूंगवास आणि ५० लाखांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tamil Nadu Minister K PonMudy Disproportionate Assets Case

मद्रास उच्च न्यायालयाने द्रमुक नेते आणि तमिळनाडूचे मंत्री के पोनीमुडी आणि त्यांची पत्नी यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने पोनमुडी यांना तीन वर्षांचा तुरूंगवास आणि ५० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. गुरूवारी मद्रास उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

मंत्री पोनीमुडी आणि त्यांच्या पत्नीने वैद्यकीय कागदपत्रे सादर करत शिक्षा कमी करण्यासाठी विनंती केली. पोनीमुडी हे ७३ वर्षे तर त्यांच्या पत्नीचे वय ६० वर्षे आहे. त्यामुळे वैद्यकीय कारण देत शिक्षा कमी करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.

तमिळनाडूचे मंत्री के पोनीमुडी यांना तीन वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर प्रत्येकी ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली असून, त्यांना अपिलासाठी जाण्याची परवानगी दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

१९९६-२००१ काळात तत्कालीन AIADMK सरकार सत्तेवर होते. या काळात २००२ मध्ये पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीविरोधात लाचलुचपत विभागाने (Vigilance and Anti-Corruption) खटला दाखल केला होता. यात त्या दोघांचे उत्पन्न १.४ कोटी असल्याची नोंद होती. मात्र 1996-2001 दरम्यान राज्य सरकारमध्ये मंत्री असताना बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा दावा DVAC ने केला आहे.

वेल्लोर मुख्य सत्र न्यायालयाने पुराव्यांअभावी 28 जून रोजी पोनमुडी आणि त्यांच्या पत्नी यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये मद्रास उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करत या प्रकरणावर पुन्हा सुनावणी सुरू केली होती. या सुनावणीदरम्यान मंत्री पोनीमुडी आणि त्यांची पत्नी दोषी असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना तीन वर्षांचा तुरूंगवास आणि ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT