सुरतमध्ये भररसत्यात एका सोशल मीडिया एन्फ्लुएनसरला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरतमध्ये चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्या एका व्यक्तीला थांबवल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली आहे. पियूष धनानीला मारहाण करण्यात आली आहे. पियूष हा एक समाजसेवक आणि सोशल मीडिया इन्फ्लूएनसर आहे. तो रस्त्याने चुकीच्या बाजूने गाडी चालवत असलेल्या व्यक्तींना थांबवून सल्ला देतो.
पियूष धनानीला रस्त्यावरील लोकांनी मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पियूषने चुकीच्या बाजूने स्कूटर चालवणाऱ्या एका व्यक्तीला थांबवले. त्याचवेळी त्याला मारहाण करण्यात आली आहे.
पियूष हा सौराष्ट्रातील अमरेली जिल्ह्यातील आहे. तो वाहनांच्या नियमांचे उल्लंघन करण्यांविरोधात मोहिम राबवतो. तो चुकीच्या बाजूने गाडी चालवणाऱ्या लोकांना पुन्हा यु-टर्न घेण्यास सांगतो आणि चांगला सल्ला देतो.
मंगळवारी पियूषने असंच एका स्कूटरचालकाला थांबवले. चुकीच्या बाजूने स्कूटर चालवत असल्याने त्याला यु-टर्न घेण्यास सांगितले. परंतु स्कूटरचालकाने नकार दिला. त्यावेळी त्याने स्कूटरची चावी काढून घेतली. त्यांच्यातील वाद ऐकून गर्दी जमा झाली. गर्दीतील लोकांनी पियूषला मारहाण केली. उपस्थित लोकांनी पियूषला मारहाण करत त्याला चावी परत देण्यास भाग पाडले.
याप्रकरणात पियूष चुकीच्या पद्धतीने बोलत होता असे स्कूटरचालकाचे म्हणणे आहे. अनेकदा व्हिडिओतदेखील तो उद्धटपणाने बोलतो असे अनेकांनी म्हटले आहे. याप्रकरणी पियूषने कोपोद्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा पोलिस तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.