१ चार्जमध्ये १५१ किलोमीटर गाठता येणार, Simple Dot One EV स्कूटर लॉन्च, किमतही कमी

Electronic Scooter Under 1 Lakh: सिंपल एनर्जी या कंपनीने नवीन ईलेक्ट्रिक स्कूटर Simple Dot One देशात लाँच केली आहे. ही नवीन स्कूटर ओला आणि एथर या कंपनीशी स्पर्धा करणार आहे.
Simple Dot One
Simple Dot OneSaam Tv
Published On

Simple Dot One Electric scooter Price And Features:

देशात सध्या ईलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाजारात नवनवीन स्कूटर लाँच होत आहेत. ईलेक्ट्रिक स्कूटर या पर्यावरणासाठी पूरक आहेत. या स्कूटरची किंमतही जास्त असते. अशातच सिंपल एनर्जी या कंपनीने नवीन ईलेक्ट्रिक स्कूटर Simple Dot One देशात लाँच केली आहे.

सिंपल ही एक स्टार्टटअप कंपनी आहे. कंपनीने आपली दुसरी ईलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच केली आहे. ही नवीन स्कूटर ओला आणि एथर या कंपनीशी स्पर्धा करणार आहे. (Simple Dot One Electric Scooter)

किंमत

सिंपल एनर्जी कंपनीने आपली दुसरी ईलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच केली आहे. कंपनीने ही स्कूटर ९९,९९९ रुपयांत सादर केली आहे. ही किंमत फक्त प्री बुकिंग युनिट्ससाठी लागू करण्याक आली आहे. ग्राहक ही स्कटर कंपनीच्या अधिकत वेबसाइटवरुन खरेदी करु शकतात. येत्या काही दिवसात या स्कूटरची किंमत वाढू शकते. नवीन किंमत जानेवारी महिन्यात लाँच केली जाणार आहे. (Electric Scooter Under 1 Lakh )

बॅटरी

कंपनीने Simple Dot One स्कूटरमध्ये कंपनीने 3.7kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. ही बॅटरी एका चार्जमध्ये 151 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल असा कंपनीने दावा केला आहे. ही स्कूटर 4 रंगामध्ये उपलब्ध आहे. नम्मा रेड, ब्रेझन ब्लॅक, ग्रेस व्हाइट आणि अझूर ब्लू या रंगात स्कूटर उपलब्ध आहे. या स्कूटरची डिलिव्हरी सर्वप्रथम बेंगळुरूमध्ये सुरू केली जाईल, असे कंपनीने सांगितले आहे.

Simple Dot One
Flipkart Sale: 50MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज; फक्त 299 रुपयांत घरी घेऊन जा 'हा' स्मार्टफोन

या स्कूटरमध्ये 8.5kW क्षमतेची ईलेक्ट्रिक मोटार वापरली गेली आहे. ही मोटर 72Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूरमध्ये ट्यूबलेस टायर्स वापरण्यात आले आहे. ही स्कूटर 2.77 सेंकडमध्ये 0 ते ४० किलोमीटर प्रतितासाचा वेग देऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

या स्कूटरमध्ये 35 लिटर अंडर सीट स्टोरेज देण्यात आले आहे. यात तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी ठेवू शकतात. तसेच टचस्क्रिन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इतर फिचर्स ऑपरेट करण्यासाठी अॅप कनेक्टिव्हिटीची सुविधा देण्यात आली आहे.

Simple Dot One
Sovereign Gold Bond खरेदी करण्यासाठी गोल्डन चान्स! १० ग्रॅम सोनं खरेदी केल्यावर सरकार देणार बंपर सूट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com