Ruchika Jadhav
केसांत कोंडा होण्याच्या समस्या अनेक तरुणांना आहेत.
काळ्यारंगाचा कोट किंवा ड्रेस घातल्यास त्यावर कोंडा पडतो आणि पटकन दिसून येतो.
केसांंना विविध शँप्यू लावले तरी कोंडा काही जाता जात नाही.
अशावेळी तुम्ही केसांत लिंबाचा रस आणि साखर हे मिश्रण लावून पाहा.
तरी देखील कोंडा जात नसेल तर आवळा तेल लावा तसेच आहारातही आवळ्याचा समावेश करा.
यासह नारळाचे तेल केसांच्या वाढीसाठी फार फायदेशीर ठरते.
केसांत जास्त कोंडा असेल तर कापूर बारीक करून खोबरेल तेलातून केसांत लावावा.
असे केल्याने लांब लचक, काळेभोर आणि डँडरफ फ्री केस होतील.