मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या भावात देखील सतत चढता आलेख पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला देखील सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे.
Sovereign Gold Bond ची सरकारी योजना (Scheme) आजपासून अर्थात १८ डिसेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही २२ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करु शकता. या योजनेतून तुम्ही १ ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी ६,१९९ रुपये खर्च करावे लागतील. ही किंमत बाजारातील सोन्याच्या किमतीपेक्षा कमी आहे. जी IBJA च्या प्रकाशित दरानुसार ठरवली जाते. जर तुम्हाला देखील Sovereign Gold Bond खरेदी करायचे असेल, तर ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही अर्ज करु शकता.
सार्वभौम गोल्ड बाँड योजनेअंतर्गत २४ कॅरेट म्हणजेच ९९.९ टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक (Investment) करण्याची संधी दिली जाते. यामध्ये तुम्हाला सरकारकडून गुंतवणुकीवर २.५० टक्के वर्षभरात व्याज दिले जाते. जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. ही योजना आरबीआयद्वारे राबविण्यात येत आहे.
1.10 ग्रॅम सोन्यावर बंपर सूट
जर तुम्ही Sovereign Gold Bond मध्ये ऑनलाइन गुंतवणूक केली असेल तर ५० रुपयांची सूट दिली जात आहे. म्हणजेच १ ग्रॅम सोन्यासाठी ६,१४९ रुपये मोजावे लागतील. तुम्हाला १० ग्रॅम सोन्यासाठी ५०० रुपयांच्या सूटवर ६१,४९० रुपये मोजावे लागतील. या योजनेअंतर्गत तुम्ही किमान १ ग्रॅम आणि जास्तीत जास्त ४ किलो सोने खरेदी करता येऊ शकते. याची परिपक्वता कालावधी हा ८ वर्षांचा आहे.
2. Sovereign Gold Bond च्या पहिल्या गुंतवणुकीतून किती परतावा मिळाला
Sovereign Gold Bond च्या पहिली गुंतवणूक ही ३० नोव्हेंबरला करण्यात आली होती. हा बाँड २६ नोव्हेंबर २०१५ रोजी २,६८४ रुपये (Price) प्रति ग्रॅम या इश्यू किंमतीवर करण्यात आला. त्याच वेळी लोकांनी मॅच्यूरिटीवर लोकांना ६,१३२ रुपये प्रति ग्रॅमवर विकला गेला. यावर ८ वर्षात गुंतवणूक केल्यास एकूण १२८.५ टक्के रिटर्न देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.