सोन्याचे भाव प्रत्येक दिवशी बदलत असतात. दिवाळीनंतर सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांचा कल हा खरेदीसाठी कमी पाहायला मिळाला आहे. अशातच सोनं खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे.
नवीन वर्षात सोनं (Gold) ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्याचा वाढता आलेख पाहाता खरेदीदारांच्या नाकी नऊ आले आहेत. सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी नोंदवली आहे.
शनिवारी गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार २४ कॅरेटनुसार ६२,६६० रुपये इतके होता तर आज यामध्ये ११० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. अशातच सोन्याचा आजचा भाव ६२, ७७० रुपये इतका आहे.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७५५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,७७० रुपये मोजावे लागणार आहे. सोन्याच्या भावात आज ११० रुपयांनी वाढ झाली. तसेच चांदीच्या किमतीही (Price ) वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,००० रुपये मोजावे लागतील. आज चांदीतही १०० ग्रॅमसाठी ३० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई - ६२,६२० रुपये
पुणे - ६२,६२० रुपये
नागपूर - ६२,६२० रुपये
नाशिक - ६२,६५० रुपये
ठाणे - ६२,६२० रुपये
अमरावती - ६२,६२० रुपये
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.