लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. या काळात अनेक गोष्टींमध्ये बदल होतात. यामध्ये प्रत्येक महिन्याला इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात लॉन्च होत असतात. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल.
नवीन वर्षाच्या (New Year) सुरुवातीला अर्थात जानेवारी २०२४ मध्ये अनेक नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. यामध्ये OnePlus, Xiaomi, Samsung आणि Vivo ब्रँडचे स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतो. या फोनमध्ये (Phone) 100W फास्ट चार्जिंगसब जबरदस्त कॅमेराही मिळणार आहे. यामध्ये कोणत्या ब्रॅण्डचा आपल्याला पर्याय मिळणार आहे पाहूया.
1. OnePlus 12
OnePlus 12 चा हा जबरदस्त फोन जानेवारी महिन्यात लॉन्च होऊ शकतो. यामध्ये 6.82 इंच 2K AMOLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 सपोर्टसह मिळणार आहे. चार्जिंगबद्दल सांगायचे झाल्यास 100W फास्ट वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टही युजर्सला देण्यात येईल. तसेच फोनमध्ये तुम्हाला 5400mAh बॅटरी देण्यात येणार आहे.
2. OnePlus 12R
चीन कंपनी OnePlus 12R ला OnePlus 12 सोबत China-only Ace ब्रँडिंग अंतर्गत लॉन्च करणे अपेक्षित होते. परंतु, कंपनीच्या 5 डिसेंबरच्या इव्हेंटमध्ये तो शो झाला नाही. OnePlus ची ही सीरीज जागतिक स्तरावर लॉन्च होणार आहे. हा फोन २३ जानेवारी २०२४ ला लॉन्च होऊ शकतो. या फोनची डिझाइनही थोडी वेगळी असणार आहे.
3. Vivo X100 Pro, X100
विवोच्या या फोनमध्ये नवीन MediaTek Dimensity 9300 प्रोसेसर देण्यात येणार आहे. यामध्ये 50MP 1 इंच IMX989 VCS सेन्सर असेल. हा फोन जानेवारीच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात येईल. यामध्ये 50MP 150 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू अल्ट्रावाइड आणि 50MP पेरिस्कोप टेलिफोटो ZSPO3 optical द्वारे प्रमाणित आहे.
4. Xiaomi Redmi Note 13
शाओमीचा हा फोन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होऊ शकतो. यामध्ये तीन फोन लॉन्च केले जाणार आहे. फोनमध्ये Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro Plus लॉन्च केले जणार आहे. तसेच फोनमध्ये 6.67 इंच 1.5K OLED डिस्प्ले देखील देण्यात येणार आहे. ज्याचा 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह मिळेल. यामध्ये MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर सपोर्ट असेल. बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.