Congress New Headquarters: काँग्रेसच्या मुख्यालयाचा पत्ता बदलणार, नव्या वर्षात इंदिरा भवनातून कामकाज

Congress New Headquarters in Delhi: भाजपनंतर आता काँग्रेसही आपला पत्ता बदलणार आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात काँग्रेस आपल्या नवीन मुख्यालयात स्थलांतरित होणार आहे.
Congress New Headquarters in Delhi
Congress New Headquarters in DelhiSaam Tv
Published On

Congress New Headquarters in Delhi:

भाजपनंतर आता काँग्रेसही आपला पत्ता बदलणार आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात काँग्रेस आपल्या नवीन मुख्यालयात स्थलांतरित होणार आहे. या नवीन मुख्यालयाला इंदिरा भवन असे नाव देण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सध्या काँग्रेस पक्षाचे कार्यालय 24, अकबर रोड, नवी दिल्ली येथे आहे.

काँग्रेसचे नवे सहा मजली आलिशान कार्यालय 9, कोटला रोड येथे आहे. तर जुन्या कार्यलयातून काँग्रेसने तब्बल 45 पक्षाचं कामकाज केलं आहे. 24 अकबर रोड येथील कार्यालय काँग्रेसला जानेवारी 1978 मध्ये मिळालं होतं. 24 अकबर रोड 10 जनपथशी जोडलेला आहे, जे काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान आहे. लुटियन्स दिल्लीतील हा एक प्रकारचा VII बंगला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Congress New Headquarters in Delhi
Pune Crime News: पुणे हादरलं! अल्पवयीन कर्णबधीर मुलीवर तिचा भाऊ आणि मित्रांकडून वारंवार अत्याचार

काँग्रेस पक्षाचे नवे मुख्यालय सहा मजली आहे. हे दीनदयाल उपाध्याय रोडवर आहे, जिथे भाजपचे मुख्यालय देखील आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने आपला मुख्य दरवाजा कोटला रोडवर ठेवला आहे.  (Latest Marathi News)

काँग्रेसचे सर्व नेते या नवीन इमारतीत स्थलांतरित होतील. फिल्हा, 26 अकबर रोड येथे काँग्रेस सेवा दल, 5 रायसीना रोड येथे युवक काँग्रेस आणि एनएसयूआय कार्यालय आहेत. या सर्वांना येथे हलवण्यात येणार आहे.

शहरी आणि गृहनिर्माण विकास मंत्रालयाने काँग्रेसला 24 आणि 26 अकबर रोडसह लुटियन झोनमधील तीन कार्यालये रिकामी करण्याची नोटीस दिली होती. या काँग्रेस कार्यालयांचे ऑलॉटमेंट जानेवारी 2015 मध्ये रद्द करण्यात आले होते. यानंतर काँग्रेसने नवीन मुख्यालय बांधण्याची प्रक्रिया सुरू केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com