Sanatan Dharma Controversy : उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत वाढ; तमिळनाडू सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस

Udhayanidhi Stalin: सर्वोच्च न्यायालयानं सनातन धर्मावर वादग्रस्त विधान करणाऱ्या तमिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिनला नोटीस पाठवलीय.
Sanatan Dharma Controversy :
Sanatan Dharma Controversy :ANI

Supreme Court Notice To Udayanidhi Stalin:

सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तामिळनाडू सरकारच्या मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिलीय. उदयनिधी आणि ए राजा यांनी सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या विधानाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावलीय. (Latest Politics News)

न्यायालय या प्रकरणाची सुनावणी इतर प्रलंबित द्वेषपूर्ण भाषणांच्या याचिकांसह सुनावणी करेल, असं न्यायालयानं म्हटलं. दरम्यान तामिळनाडूमध्ये सनातन धर्माविरोधात होणारे कार्यक्रम असंवैधानिक घोषित करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका चेन्नईच्या एका वकिलाने दाखल केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले होते उदयनिधी

चेन्नई येथील एका कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिननं सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियाशी केली होती. डेंग्यू-मलेरियावर फक्त प्रतिबंध करून उपयोग नाही , तर त्याचा नायनाट केला पाहिजे. त्याचप्रमाणे सनातन धर्माचना नायनाट करावा लागेल. असं उदयनिधी म्हणाले होते. दरम्यान सनातन धर्माबाबत विष ओकणाऱ्या स्टॅलिनला आपल्या वक्तव्याचा अजिबात पश्चाताप नाही.

आपल्या विधानावर ठाम असल्याचं ते म्हणालेत. ते सनातन धर्माबाबत सातत्याने वक्तव्ये करत आहेत. अस्पृश्यताही संपवण्यासाठी सनातन धर्म संपवला पाहिजे, असं उदयनिधी म्हणाले. दरम्यान उदयनिधी स्टॅलिन हे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आहेत. ते तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री देखील आहेत.

Sanatan Dharma Controversy :
M. K. Stalin Speech News | India Alliance News | स्टॅलिन यांचं मातृभाषेत भाषण

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com